इंडियन आयडलच्या तिन्ही जजला गायिका सुनिधी चौहानने पाडले उघडे; केले हे गंभीर आरोप

June 02, 2021 , 0 Comments

‘इंडियन आयडल’ हा रियालिटी शो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो.  या शोशी संबधित  अनेक धक्कादायक वादही समोर आले आहेत. अलीकडेच सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांनी असे काही सांगितले आहे, ज्यामुळे तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

सुनिधी या शोमध्ये पाच/ सहा वर्षापूर्वी जज म्हणून कार्यरत होती पण नंतर तिने सिंगिंग रियालिटी शो सोडला. शोशी संबंधित वादांविषयी बोलताना सुनिधीने आपल्या मुलाखतीत सांगितले आहे की तिने ‘इंडियन आयडॉल’ शो का सोडला ? तसेच शो बाबत अनेक खुलासे केले आहे.

काही दिवसांपूर्वी अमित कुमार यांनी असा दावा केला होता की या शोच्या निर्मात्यांनी त्यांच्या मताची पर्वा न करता स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले होते. शोमध्ये अमित कुमार पाहुणे म्हणून दाखल झाले होते. तेव्हा शोमध्ये किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहिली गेली.

एका मुलाखतीत बोलताना सुनिधी चौहान यांनी सांगितले आहे की ज्यावेळी मी जज म्हणून होते तेव्हा निर्मात्यांनी तिला स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले होते. ती हे सर्व करण्यास असमर्थ होती. सुनिधी चौहान यांनी असेही सांगितले की प्रत्येकासाठी हे करणे आवश्यक नाही परंतु हो आम्हाला असे करण्यास सांगितले गेले होते.

मी हे सर्व करू शकत नव्हते. त्या लोकांना जे हवे होते तेच मला करण शक्य नव्हत, त्यामुळे माझा मार्ग वेगळा करावा लागला. म्हणूनच आज मी या रियालिटी शोची जज म्हणून कार्यरत नाही. या मुलाखतीत सुनिधीने इंडियन आयडलचे जज नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांच्याबद्दलही भाष्य केलं. हे तिनही जज स्पर्धकांच्या चुका सुधारत नाहीत. सकारात्मक टीका करत त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करने फार गरजेचे आहे.

इंडियन आयडलचे मेकर्स केवळ प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी असं करत असावे किंवा प्रेक्षकांनी या शोसोबत जोडलेलं राहावं म्हणून असं केलं जातं असावं असं सुनिधी म्हणाली. या सर्वात खरं कौशल्य असणाऱ्या एका गायकाचं मोठं नुकसान होतं असल्याचं दु:ख सुनिधीनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा-

विशाल ददलानीने इंडियन आयडल १२ मध्ये पुन्हा येण्यास दिला नकार; आदित्य नारायणे सांगितले त्यामागचे कारण

पाकिस्तान कर्णधाराने केला बहिणीशी साखरपुडा; काही दिवसांपूर्वीच झाले होते लैंगिक शोषणाचे आरोप

नोकरीत मन लागत नव्हते म्हणून सुरू केली बेकरी, पतीच्या मदतीने महिन्याला कमावते ३ लाख


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: