विशाल ददलानीने ‘इंडियन आयडल १२’ मध्ये पुन्हा येण्यास दिला नकार; आदित्य नारायणे सांगितले त्यामागचे कारण

June 02, 2021 , 0 Comments

संगीतकार आणि गायक विशाल ददलानी मागील काही दिवसांपासून शोमध्ये दिसले नाही. यावर प्रश्न केला असता त्यांनी ‘इंडियन आयडल १२ ‘ मध्ये येण्यास नकार दिला आहे असे समोर आले. विशाल ददलानी मागील तीन सिजनपासून  या गायन रिअ‍ॅलिटी शोचे जज म्हणून कार्यरत आहे.

या शोमधील न्यायाधीश नेहा कक्कड़ आणि हिमेश रेशमिया यांच्याशी त्यांची चांगलीच मैत्री झाली होती. मात्र अलीकडे जेव्हा महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु झाल तेव्हा शोच्या मेकर्सने पूर्ण टीमसह शूटिंग दमणला हलवले.

विशाल ददलानी यांच्यासह नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी शूटसाठी दमणला जाण्यास नकार दिला. त्यांच्या जागी मनोज मुंताशिर आणि अनु मलिक यांना या कार्यक्रमाचे जज म्हणून कार्यरत करण्यात आले होते.

नेहा कक्कर आणि अनु मलिक आणि हिमेश रेशमिया आता ‘इंडियन आयडल १२’ मधे दिसतात. तर विशाल ददलानी यांनी परत येण्यास नकार दिला आहे. त्यांनी मिडीयाला माहिती देताना सांगितले आहे की ते लॉकडाउन पूर्ण होईपर्यंत या शोमध्ये परत येणार नाही.

त्याच वेळी इंडियन आयडल १२ चा होस्ट आदित्य नारायण यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विशाल ददलानी शोमध्ये परत न येण्याबद्दल स्पष्ट केले आहे. त्याने सांगितले आहे की, गेल्याच वर्षी विशाल लोणावळ्यात शिफ्ट झाला आहे आणि त्याच्या  पालकांसोबत राहत आहे.

त्याला लोणावळ्याहून प्रवास करत दमणला जायचे आणि मग पुन्हा घरी परत यायचे नाही. यामुळे त्यांच्या पालकांना कोविड संसर्ग होण्याचा धोका निर्माण होवू शकतो. यावरून आपल्या लक्ष्यात येते की कुटुंबाच्या काळजीपोटी विशाल ददलानी यांनी शोमध्ये पुन्हा जाण्यास नकार दिला आहे.

हे ही वाचा-

देव तारी त्याला कोण मारी! भरधाव ट्रकच्या खाली येऊन पण वाचला दोन तरुणांचा जीव; पहा थरारक व्हिडिओ

वडीलांना १२०० किमी सायकलवर डबल सीट नेनाऱ्या सायकल गर्लवर कोसळला दुखाचा डोंगर; वडीलांचा मृत्यू

या समाजात मृतदेहासोबत नाचतात लोक, पुढे जे करतात ते वाचून धक्का बसेल


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: