‘देवमाणूस’मधील दिव्या सिह रिअल लाईफमध्येही दिसतीय तितकीच सुंदर; पहा फोटो

June 05, 2021 , 0 Comments

‘देवमाणूस’ मालिका सध्या चर्चेत असलेली पाहायला मिळते. तसेच या मालिकेने टीआरपीच्या बाबतीतदेखील अव्वल स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत एसीपी दिव्या सिह्ची भूमिका अभिनेत्री नेहा खानने साकारली आहे. या मालिकेतील तिच्या एंट्रीनंतर मालिकेत नवा ट्विस्ट निर्माण झाला.

एसीपी दिव्याने देवी सिग उर्फ डॉ. अजित कुमार देवचे पितळ उघडे पडण्यासाठी खूप प्रयत्न केले. दिव्याने आपल्या अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. नेहा खान तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. आज आपण अभिनेत्री नेहाचा संघर्षमय प्रवास पाहणार आहोत.

Neha Khan marathi actress 6 | DreamPirates

नेहाने आपल्या अभिनयाच्या प्रवासाची सुरवात अतिशय संघर्षातून केली आहे. नेहाच्या आई-वडिलांनी लव्ह मॅरेज केल्यामुळे दोन्ही परिवारांनी त्यांना स्वीकारलं नाही. नेहाच्या आईला संपत्ती मिळू नये म्हणून गुंडांनी मारहाण केली. यामध्ये तिच्या आईच्या शरीराला मोठी इजा झाली आणि ३६० टाके पडले.

Neha Khan marathi actress 28 | DreamPirates

नेहा लहानपणापासूनच दिसायला फारच सुंदर होती. परंतु परिस्थिती गरीब असल्याने या गोष्टींकडे तिचे कधी लक्ष्यच गेले नाही. नेहाने एका मुलाखतीत सांगितले की, शेजारच्या काकुनी एक दिवस मला फोटो स्टुडीओमध्ये नेल,आणि माझे काही फोटो काढले. त्यावेळी फोटोग्राफरने मला विचारल तुझे फोटो पेपरमध्ये देऊ का?

Neha Khan marathi actress 23 | DreamPirates

त्यावेळी मला माझ्या सौदर्याची जाणीव झाली, असे नेहा म्हणते. कारण नेहाच्या घरी आरसा नव्हता असेही तिने स्पष्ट केले. फोटोखाली आपल नाव दिल तर वडिलांच्या भावना दुखावल्या जातील या भीतीने तिने नेहा महल्ले असे आईचे आडनाव दिले. त्यावेळी अनेक लोकांनी मला अभिनेत्री होण्याचा सल्ला दिला.

Neha Khan Indian model Wiki, Bio, Profile, Caste and Family Details revealed - Filmy Voice

नेहाने तिच्या संघर्षमय प्रवासाबद्दल आणखी एक किस्सा सांगितला. नेहा खान मुळची अमरावतीची आहे. मुंबईत ऑडीशनला येताना ही गोष्ट ती वडलांपासून लपवून ठेवायची. त्यासाठी ती छोटी bag आणायची. फेसबुकवर ओळख झालेल्या लोकांना भेटायची. बऱ्याच वेळा रेल्वे चुकल्याने ती पेपर टाकून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर झोपायची. असा २/३ वर्ष संघर्ष करावा लागला.

PHOTOS : उपाशी पोटी ऑडिशन देणारी नेहा झाली सुपरस्टार; पाहा ACP दिव्याची संघर्षगाथा– News18 Lokmat

नेहाला पाहिलं काम किशोरी शहाणे आणि सतीश कौशिक यांचे सेक्रेटरी अमरजित यांच्या मदतीने मिळाल. त्यांनी तिला खूप मदत केली. पुढे ‘U वा’ हा जिमी शेरगिलसोबतचा पहिला चित्रपट मिळाला.

नेहाने मराठीसोबतच हिंदी आणि मल्याळम चित्रपटातदेखील काम केले आहे. तसेच तिने शिकारी, घायल, वन्स अगेन, गुरुकुल, काळे धंदे, हाफ टूथ, अश्या अनेक चित्रपटात काम केले आहे. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘देवमाणूस’ मालिकेतील दिव्या सिंग या भूमिकेमुळे.

हे ही वाचा-

विराटची विराट कमाई! वर्षात कमावले २२९ कोटी, फोर्ब्सच्या यादीत एकमेव क्रिकेटर

वर्षाच्या मुलीला घरामोरून बिबट्याने नेले उचलून, थोड्यावेळाने ती सापडली, पण..

अंकिता लोखंडेच्या चाहत्यांना धक्का, या कारणामुळे सोशल मिडीयाला ठोकला रामराम


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: