भारतीय क्रिकेट संघाला मिळणार दोन कॅप्टन; विराट कोहलीने दिले स्पष्ट संकेत

June 05, 2021 , 0 Comments

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंड विरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ बुधवारी (२ जून) इंग्लंडला रवाना झाला. इंग्लंडला जाण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकारांसमोर सल्ला मसलत केली. दोघांनीही पत्रकारांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. त्याचवेळी विराटने भारतीय संघात दोन कर्णधारांच्या शक्यतेबाबत बोलले आहे.

पत्रकारांशी बोलताना विराटने संघाच्या एकंदरीत परिस्थितीबद्दल आणि बायो-बबल याविषयी बोलताना म्हटले आहे की, बऱ्याच काळापासून आम्ही सगळे खेळाडू ज्या वातावरणात राहतोय त्यामध्ये खेळाडूंत उत्साह टिकवून ठेवणे आणि मानसिकदृष्ट्या खंबीर राहणे  अत्यंत गरजेचे आहे.

रोजची एकंदरीत एकसारखी जीवनशैली लक्ष्यात घेता भविष्यात एका देशाचे दोन संघ वेगवेगळ्या ठिकाणी खेळणे हा प्रसंग नेहमी घडत राहील. दोन संघ खेळणार म्हटल्यावर दोन कर्णधार लागणारच आहे. यासोबतच विराटने संघाच्या तयारीविषयी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याबाबतही आपली अनेक  मते मांडली.

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम १८ ते २२ जून या कालावधीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. तसेच भारतीय संघाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे मधल्या कालावधीत भारतीय टीम भारतात येण्यापेक्षा इंग्लंडमध्येच राहून या मालिकेची तयारी करेल.

भारताची मुख्य टीम इंग्लंडमध्ये असताना आणखी एक संघ श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. हा खेळ जुलै महिन्यात खेळला जाणार आहे. त्यामुळे या टीमचे प्रशिक्षक  माजी भारतीय खेळाडू व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक राहुल द्रविड हे असतील.

हे ही वाचा-

कौतुकास्पद! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित सासऱ्याला नेलं पाठीवर उचलून, सुनेचा फोटो व्हायरल

दुर्दैव! राष्ट्रीय खेलो इंडिया पदक विजेती संजना बागडीवर मजुरी करण्याची वेळ

विराटची विराट कमाई! वर्षात कमावले २२९ कोटी, फोर्ब्सच्या यादीत एकमेव क्रिकेटर


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: