५१८ सिनेमांमध्ये काम करुनही यांनी मला नाही ओळखलं; अनुपम खेर यांचा व्हिडिओ व्हायरल

June 27, 2021 , 0 Comments

आपल्या अभिनयामुळे अनुपन खेर यांनी फक्त भारतातच नाही, तर जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. पण नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगामुळे अनुपम खेर हे चांगलेच गोंधळात पडले आहे.

सध्या अनुपम खेर शिमल्यात आपल्या कुटुंबासोबत वेळ घातवत आहे. पण इथे त्यांच्यासोबत एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. कारण दिग्गज अभिनेता असुनही गावातील एका माणसाने त्यांना ओळखण्यास नकार दिला आहे.

शिमला येथे असताना अनुपम खेर रोज मॉर्निंग वॉकला जात आहे, त्याचे व्हिडिओपण ते पोस्ट करताना दिसून येत आहे. आता त्यांनी त्यांच्या एका मॉर्निंग वॉकचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांना एक अनोळखी माणूस त्यांना भेटला आहे.

अनुपन खेर त्याला विचारपुस करताना दिसत आहे. ते कुठे राहतात, त्यांचे घर किती दुर आहे. त्यानंतर अनुपन खेर त्यांना नाव विचारतात, तेव्हा ते आपले नाव ज्ञानचंद असल्याचे सांगतात. तेव्हा अनुपम खेर विचारतात, तुम्हाला माझे नाव माहित आहे? त्यावर ज्ञानचंद नाही, असे उत्तर देतात.

त्यानंतर तुम्ही मला ओळखतात का? असा प्रश्न अनुपम खेर विचारता, तेव्हा पण ती व्यक्ती नाही उत्तर देते. मग अनुपम खेर मास्क काढून विचारतात आता ओळखलं का? त्यावर तो व्यक्ती म्हणतो सर तुमचे नाव लक्षात नाही आलं, हे ऐकून अनुपन खेर आश्चर्यचकितच होतात.

५१८ सिनेमांमध्ये काम करुनही यांनी मला ओळखलं नाही. डबक्यात बुडुन मरण्याची वेळ आलीये, असे मजेशीरपणे म्हणताना अनुपम खेर दिसत आहे. मला वाटत होतं, मला प्रत्येकजण ओळखतो, पण ज्ञानचंदजींमुळे माझ्या आत्मविश्वासाला तडे गेले आहे. त्यांना माहित नव्हतं मी कोण आहे, पण मला हे फार मजेशीर वाटलं. मला पुन्हा जमीनीवर आणण्यासाठी धन्यवाद मित्रा, असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.

अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे, तर ५६ हजार लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“माझ्या हातात सुत्र दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळुन देईल, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईल”
video; आरोग्यमंत्र्यांचं बिंग फुटलं, महिला सहकाऱ्यासोबत घट्ट किस करताना CCTV त कैद
आई शप्पथ! तुम्ही कधी ‘इतका’ सुंदर साप पाहिला आहे का? नसेल पाहिला तर एकदा व्हिडीओ पहाच


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: