लोकशाही रक्षकांचा सत्कार, युवमोर्चा कडून इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या विरोधात पाळला गेला काळा दिवस

June 27, 2021 , 0 Comments

भारतीय जनता युवा मोर्चा शिरडी शहर यांच्या वतीनी युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या या कार्यक्रमाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक किरण भाऊ बोराडे यांच्या सूचनेनुसार तसेच भाजपा जिल्हाअध्यक्ष राजेंद्र भाऊ गोंदकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने 25 जून 1975 आणीबाणी (काळा दिवस)यानिमित्ताने आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्या लोकशाही रक्षक यांचा भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने घरी जाऊन सत्कार समारंभ करण्यात आला.
       आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस सरकारने माध्यमां ची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्या ची गळचेपी केली. देशाच्या सुरक्षेचा कांगावा करून अनेक विरोधी नेत्यांना व लाखो लोकांना तुरुंगात डांबले. आणीबाणीच्या विरोधात तेव्हा तत्कालीन जनसंघाच्या नेत्यांनी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो कार्यकर्त्यांनी देशभर प्रखर आंदोलने करून जनजागृती केल्याने दडपशाहीच्या या लोकशाहीविरोधी कारवाईपासून इंदिरा गांधी यांना माघार घ्यावी लागली होती. राष्ट्रप्रेमी संघटित शक्तीपुढे दडपशाही प्रवृत्तीचा टिकाव लागत नाही, याची जाणीव जागी ठेवण्याकरिता २५ जूनला काळा दिवस पाळण्याचे भाजपाने ठरविले आहे,यावेळी  आणीबाणी काळातील कार्यकर्त्यांच्या त्याग व बलिदान यांचे स्मरण म्हणून आज
श्री बाबुरावजी शिवराम पुरोहित
श्री.रावसाहेब मुरलीधर गोंदकर
श्री दिलीप कन्हैयालाल संकलेचा
श्री अरुणकुमार पुरूषोत्तम दोडिया
श्री सुभाष गणपत कोते. 
     यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष-योगेश गोंदकर, युवा वारियर अध्यक्ष-सागर बेलदार, सरचिटणीस-लखन बेलदार, उपाध्यक्ष- प्रसाद शेलार,सचिन घुले, सचिव-राजेंद्र बलसाने, पंकज दुशिंग, हितेश मोटवानी, शुभम सुराणा, सोशल मीडिया सहप्रमुख-सागर जाधव, कोषाध्यक्ष-अक्षय मुळे, प्रसिद्धीप्रमुख-महेश सुपेकर, सह-प्रसिद्धीप्रमुख विशाल नागपुरे, युवा वारियर सरचिटणीस-सागर भोईर,सागर रोकडे, सदस्य-ऋषिकेश कोंडीलकर, दीपक सदाफळ  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: