अवघ्या ७ वर्षाच्या मुलीच्या धाडसाचे आयएएस अधिकाऱ्यानेही केले कौतूक; म्हणाला, ही मुलगी माझी गुरू..

June 01, 2021 , 0 Comments

अनेक ठिकाणी काही लहान मुलांच्या अंगात अनेक कला असतात. त्यांची जिद्द देखील अफलातून असते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एखादी गोष्ट करायची ठरवली तर अशक्य असे काहीच नाही, असे या विडिओमध्ये बघून आपल्या लक्षात येईल.

अनेकांना उंच डोंगरावर चढायला आवडते. मात्र एखाद्या भिंतीवर किंवा पिलरवर शक्यतो कोण जास्त चढत नाही. पिलरवर चढणे सोपे नसते. त्यासाठी आपले शरीर लवचिक असले पाहिजे. मात्र आपल्या शरीराचा तोल संभाळत एक ७ वर्षांची चिमुकली हे काम फत्ते करते.

या लहान मुलीचा सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामुळे या मुलीचे कौतुक केले जात आहे. कितीही वेळा अपयश आपले तरी मैदान सोडायचे नाही, हे यावरून तिने दाखवून दिले आहे. प्रयत्न केले की यश हे हमखास मिळते हे देखील तिने दाखवून दिले आहे.

ती मुलगी पिलरवर चढायचा प्रयत्न करत आहे. सुरूवातीला ती त्या पिलरवर चढण्याचा प्रयत्न करते. परंतू, चढण्यासाठी कोणताही आधार नसल्याने ती अनेकदा खाली पडते. ती पुन्हा दुसऱ्यांना प्रयत्न करते. ती अनेक प्रयत्न करते मात्र ती खालीच पडते.

मात्र ती आपले प्रयत्न सोडत नाही, आणि हळूहळू थोडी थोडी वर जाते. अनेकदा खाली पडून देखील मागे हटत नाही. काहीवेळ असेच सुरू राहिल्यानंतर अखेर ती त्या पिलरच्या टोकापर्यंत पोहचते. आणि ती वरती चढण्यात यशस्वी होते.

तिचा हा व्हिडीओ आयएएस अधिकारी. एम. व्हि. राव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरून शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करताना ‘ही लहान मुलगी माझी गुरू आहे’ असे कॅप्शनही दिले आहे. यामुळे तिचे कौतुक केले जात आहे.

ताज्या बातम्या

तेव्हा मला दोन पावलं चालणंही अवघड झालं होतं; मलाईकाने सांगीतला तो धक्कादायक अनुभव

वीकेंडला शिक्षिकेने माजी विद्यार्थ्यासोबत वारंवार बनवले शरीरसंबंध, १७ वर्षीय विद्यार्थी म्हणाला..

शिक्षिकेने पार केल्या सगळ्या सीमा, आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलासोबत बनवले शारिरिक संबंध


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: