भविष्यात माझी जागा कोणीही घेऊ शकतो, गरज नाही की त्याचे आडनाव टाटाच हवे! असं का म्हणाले रतन टाटा? वाचा सविस्तर…

June 01, 2021 , 0 Comments

मुंबई | टाटा ट्रस्टवर टाटा कुटुंबियांचा कोणताही असा विशेष अधिकार नाही. भविष्यात टाटा कुटुंबियांच्या बाहेरच्या व्यक्तीकडे याची जबाबदारी दिली जाऊ शकते. असे खुद्द रतन टाटा यांनी न्यायालयाला सांगितले आहे. रतन टाटा सध्या टाटा समुहाचे चेअरमन आहेत.

मिस्त्री कुटुंबियांची कंपनी असलेल्या सायरस इन्व्हेस्टमेंटद्वारे दाखल करण्यात आलेल्या याचिकेला उत्तर देताना रतन टाटा यांनी सांगितले की, भविष्यात माझे पद आणखी कोणीतरी सांभाळू शकेल.

गरज नाहीये त्याचे आडनाव टाटाच असायला हवे. व्यक्तीचे एक निश्चित वय असते मात्र संस्था काम करतच राहतात. टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्सच्या चेअरमनपदासाठी टाटा कुटुंबियांकडे कोणताही विशेष अधिकार नाही.

टाटा ट्रस्टचे व्यवस्थापन बदलण्याच्या दृष्टीने विचार चालू असताना आणि काम चालू असताना रतन टाटा यांनी ही गोष्ट सांगितली आहे. रतन टाटा विविध क्षेत्रातील मान्यवर लोकांची समिती तयार करू शकतात. यात तत्वज्ञान व मानव्यशास्त्र क्षेत्रातील अनेक लोकांचा समावेश असू शकतो.

टाटा सन्समध्ये टाटा कुटुंबियांची ३ टक्के पेक्षा कमी भागीदारी आहे. कुटुंबियांना कसलाही विशेष अधिकार किंवा भूमिका दिलेली नाही.


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: