धक्कादायक! मॅगी आरोग्यास घातक आहे; मॅगी बनवणाऱ्या कंपनीने स्वत:च केले मान्य

June 02, 2021 , 0 Comments

नेस्ले कंपनीची अनेक उत्पादने जगभरात प्रसिद्ध आहेत.
मॅगी नुडल्स , किटकॅट कॅडबरी आणि नेसकॅफे याप्रकारची लोकप्रिय उत्पादने बनणाऱ्या या कंपनीच्या अंतर्गत कागदपत्रांमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

कंपनीच्याच अंतर्गत अभ्यासात नेस्लेची अनेक उत्पादने हेल्दी नसल्याधक्कादायकचे म्हंटले जात आहे. त्यामुळे ही कंपनी पुन्हा वादात अडकली आहे. या कंपनीच्या अहवालात उत्पादने हेल्दी नसून आरोग्यपूर्ण नसल्याचे स्पष्ट केले आहे. या अहवालात कंपनीने मान्य केलंय की, नेस्ले कंपनीचे 60 टक्क्यांहून अधिक फूड आणि ड्रींक प्रोडक्ट्स हे ‘अनहेल्दी’ आहेत. त्यामुळे आता या कंपनीने उत्पादनांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

काही उत्पादने ही आरोग्यासाठी कधीच चांगली नव्हती. आपण कितीही चांगल्या पध्दतीने तयार करण्याचा प्रयत्न केला तरी काही उत्पादने कधीच हेल्दी नव्हती, असेही या अहवालात म्हटले आहे. यूके बिझनेस डेली फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य स्टार रेटिंग सिस्टमनुसार नेस्लेचे केवळ 37 टक्के फूड आणि पेय प्रॉडक्टचे रेटिंग 3.5 पेक्षा जास्त होती. या सिस्टमनुसार, फूड प्रॉडक्ट्सला 5 पैकी गुण दिले जातात. मात्र, कंपनीचे पाणी आणि डेयरी उत्पादनांची कामगिरी चांगली आहे.

याबाबत खुलासा करताना नेस्ले SA च्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, आमची उत्पादने त्यांच्या पोषणविषयक गरजा आणि संतुलित आहारासाठी मदत करतात. यासाठीच कंपनी सध्या काम करत आहे. कंपनीने पुढे आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही गेल्या दोन दशकांमध्ये आमच्या उत्पादनांमध्ये साखर आणि मीठ लक्षणीय प्रमाणात कमी केले आहे, अलीकडच्या काही वर्षांत आम्ही पौष्टिक मानकांची पूर्तता करणारी हजारो उत्पादने मुलांसाठी आणि कुटूंबासाठी बाजारात आणली आहेत.


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: