२०२४ ला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असावा.? राज ठाकरे म्हणाले…

June 02, 2021 , 0 Comments

मुंबई । २०२४ ची लोकसभा निवडणूक अजून लांब असली तरी त्याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. काही राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच झाल्या. यामध्ये भाजपला काही ठिकाणी संपूर्ण ताकद लावून देखील मोठे अपयश आले. यामुळे २०२४ ला काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सगळी ताकद लावली होती. मात्र ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पराभव केला. यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडे आता पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून बघितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशात सध्या तरी भाजप हा सत्ताधारी पक्ष आणि ममता बॅनर्जी या विरोधी पक्ष असल्याचंच चित्रं दिसत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज यांनी राष्ट्रीय नेत्या म्हणून ममता बॅनर्जी यांच्या पारड्यात मत टाकून एकप्रकारे ममतादीदींना पंतप्रधानपदासाठीच पसंती दिली असल्याचे बोलले जात आहे.

यामुळे ममता बॅनर्जी या केंद्रीय पातळीवर आपली जादू दाखवणार का हे लवकरच समजेल. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षात मी इतकी भांबावलेली राजकीय परिस्थिती पाहिली नाही. देशात कोण कुणाचा राजकीय शत्रू आहे आणि कोण कुणाचा मित्र आहे हे समजत नाही.

तसेच एकवेळ अशी येते की आता याचे वाजले बरं का? असे वाटू लागते आणि दोन दिवसानंतर असे कळते की दोघे एकमेकांना भेटले. त्या दोघांनी एकमेकांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कधी शरद पवारांना फोन जातो. शरद पवार कधी अमित शहांना भेटतात, हे कळायला मार्गच नाही.

आता राज ठाकरे यांनी राष्ट्रीय नेत्या म्हणून ममता बॅनर्जी यांची भलामण केली आहे. पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून ममता बॅनर्जींना पसंती असल्याचे मानले जात आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार हे लवकरच समजेल.

ताज्या बातम्या

धक्कादायक! मॅगी आरोग्यास घातक आहे; मॅगी बनवणाऱ्या कंपनीने स्वत:च केले मान्य

रणबीर व तिला एकत्र पाहताच ऋषी कपूर म्हणाले होते आलिया नाही तर ‘हिच्यासोबत’ व्हावे रणबीरचे लग्न; जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती

पाकिस्तान कर्णधाराने केला बहिणीशी साखरपुडा; काही दिवसांपूर्वीच झाले होते लैंगिक शोषणाचे आरोप


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: