बोंबील खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा; होईल मोठा फायदा

May 26, 2021 , 0 Comments

सध्याच्या परिस्थितीत अनेक आजार आ-वासून उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तसेच काही पदार्थ एकत्र खाल्याने देखील वेगवेगळे आजार उद्भवलेले पाहायला मिळतात. त्यांपासून सावधगिरी बाळगण गरजेचे आहे. अश्याच एका आजाराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

एक काळ असाही होता की ज्यावेळी भारतामध्ये शाकाहारी लोक जास्त प्रमाणात होते. परंतु आता मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या आणखी वाढली आहे. लोक मांसाहाराचे खूपच शौकीन असतात. मांसाहारामध्ये असे अनेक पदार्थ असतात त्याचे सेवन लोक आवडीने करत असतात.

बोंबील खाणारे लोक देखील भरपूर आहेत हे लोक आवडीने हे पदार्थ खात असतात. याला ड्राय फिश देखील म्हटले जाते. अशा प्रकारचे मासे खाण्यासाठी खूपच चविष्ट व स्वादिष्ट असतात. याबरोबरच यामध्ये अनेक पौष्टिक तत्व सामावलेले असतात जसे आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात.

बोंबील हा मासे प्रेमींचा आणि पोषक घटकांनी भरपूर असा मासा आहे. बोंबलामध्ये ओमेगा ३ फॅटी असिड, प्रथिने, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे हे घटक असतात. शिवाय चरबीचे प्रमाण चांगले असते. इतर माशांच्या तुलनेत या माशात लोहाचे प्रमाण अधिक असल्याने खूप उपयोग होतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, नखे, केस आणि त्वचा यांच्या आवश्यक असलेले घटक बोंबलामध्ये भरपूर प्रमाणात असतात.

सध्या बऱ्याच लोकांची कामे  कंप्यूटर आणि मोबाईल शिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे अनेक डोळ्यासबंधीच्या आजारांना सामोरे जावे लागते. बोंबीलाच्या सेवनामुळे डोळ्या संबंधीचे काही विकार असतील तर ते नष्ट होत असतात. त्यातील उपयोगी घटक अनेक आजारांना दूर ठेवते.

अनेकदा कंप्यूटर मोबाईल समोर तासन्तास काम केल्यानंतर किंवा बघितल्यानंतर डोळे खूपच थकून जात असतात. कधी कधी जळजळ होणे, खाज येणे, डोळे लाल होणे अश्या अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी बोंबीलचे सेवन केल्यास डोळ्याचा आलेला थकवा तसेच इतर समस्या नश्ट होतात. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या लोकांनी बोंबीलचे सवेन करणे महत्वाचे ठरते.

हे ही वाचा-

सोलापूरच्या भांगे कुटुंबियांचा नादच नाय! तीन गुंठ्यांत ७५ प्रकारची पिके, कमावतात हजारो

तौक्तेपेक्षाही खतरनाक आहे यास चक्रीवादळ; महाराष्ट्रातील ‘या’ भागाला बसू शकतो फटका

अन् भारताच्या कोरोना परिस्थितीबद्दल सांगताना न्युझिलंडचा खेळाडू ढसा ढसा रडू लागला


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: