४ समोसे २० रुपयांचे की ४०? चिमुरड्याच्या निरागस युक्तीवादाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

May 26, 2021 , 0 Comments

मुंबई | सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती मिळते. सध्या चर्चेत असणाऱ्या व्हिडीओमध्ये एक मुलगा समोसे विकत आहे. यावेळी त्याची हिशोबात होणारी गफलत खूपच मजेशीर आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने पुर्वी १८०० रुपयांचा हिशोब करणाऱ्या काकूंच्या व्हिडीओची आठवण करुन दिली आहे. तेव्हा त्या काकू १८०० रुपयांच्या हिशोबावरुन तरुणाशी वाद घालत होत्या. तो वाद भलताच विनोदी होता. समोसा विकणारा हा मुलगाही तशाच प्रकारे समोसे घेणाऱ्या ग्राहकांशी वाद घालताना दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ अक्षय यादव यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी याला भन्नाट असे कॅप्शन दिले आहे. ते लिहितात, १८०० च्या अपार यशानंतर १०+१०=४० ची नवीन झलक ५ रुपयांच्या ४ समोस्यांची किंमत होतेय ४० रुपये. कॅप्शनप्रमाणेच व्हिडीओ मजेशीर आहे.

व्हिडीओमध्ये लहान मुलगा एका काकूंच्या घरी समोसे विक्रीसाठी जातो. त्या काकू चार समोसे घेतात. खरी गंमत चालू होते ती समोसे घेतल्यानंतर त्याचा हिशोब करताना. चार समोसे पाच रुपयांनी घेतले तर त्याचे ४० होतात असं तो म्हणतो.

समोस्याचे ४० रुपये झाले असे तो आत्मविश्वासाने म्हणतो. ४० रुपयांवर तो ठाम असतो. यावर तो हातातील समोसे खाली ठेवतो काकूंनी खरेदी केलेल्या समोसाचा हिशोब सांगतो. तेव्हा तो दहा दहा चाळीस असं गणित मांडतो. तो मुलगा हा हिशोब करताना खूपच मासूम दिसतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचे दोन गट पडल्याचे दिसते. एक गट या मुलाबद्दल सहानुभूती व्यक्त करताना दिसतो. तर दुसरा गट त्याची चेष्टा उडवताना दिसतो.

महत्वाच्या बातम्या-
“PM केअर फंडात अडीच लाख दिले, पण मरणाच्या दारातील माझ्या आईला बेड नाही मिळाला”
‘छु कर मेरे मन को’ ह्या गाण्यावर भडकले होते अमिताभ बच्चन; राजेश रोशन यांनी सांगितला भन्नाट किस्सा
पॅनकार्ड काढा फक्त १० मिनिटात, तेही अगदी मोफत जाणून, घ्या प्रक्रिया


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: