‘अग्गबाई सुनबाई’ मालिका होणार बंद? ‘या’ प्रसंगामुळे प्रेक्षकांची मने दुखल्याने मोठा फटका

May 26, 2021 , 0 Comments

मनोरंजनाच्या हेतूने प्रसारित केल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये अनेक प्रसंगांमुळे लोकांची मने दुखावली जातात. कधी जाती-धर्माचा अपमान होतो तर कधी एखाद्या जवळच्या वाटणाऱ्या वस्तूंचा, त्यामुळे त्या मालिकांच्या टीआरपी वर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला पाहायला मिळतो. असे असतानाही अनेक मालिकांमध्ये असे प्रसंग नकळत घडलेले पाहायला मिळतात.

‘अग्गबाई सुनबाई’ मालिकेतील संकल्पनेवर वारंवार प्रेक्षक सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त करत आहेत.भरीस-भर म्हणजे इतक्यातच प्रदर्शित झालेल्या ‘अग्गबाई सुनबाई’ मालिकेतील भागात असाच एक प्रसंग दाखवला आहे, त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळाले.

‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेमध्ये शुभ्रा ही स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असते. यासाठी ती तिच्या आधीच्या कंपनीत इंटरव्युव द्यायला जाते परंतु तिथेही तिला नकार पत्करावा लागतो. अजून एक प्रयत्न म्हणून ती मशीनवर बसून कपडे शिवताना दाखवली आहे.

मालिकेत सोहमची भूमिका साकारणारा अद्वैत दादरकर मालिकेतील आपल्या पत्नीला हिणवण्यासाठी शिलाई मशीनला लाथ मारतो. तिला वाटेल ते बोलून तिचा अपमान करतो आणि तिचा आत्मसन्मान दुखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. हे दृश्य पाहून प्रेक्षक संतापले होते.

वेगवेगळ्या भागातून अनेक प्रेक्षकांनी आपली मत मांडली. तर काही प्रेक्षकांनी झी वाहिनीला पत्र आणि इमेल पाठवून आपली नाराजी व्यक्त केली. देशभरातील अनेक लोकांसाठी शिलाई मशीन हे त्यांच्या उपजीवीकेचं साधन आहे. ते या मशीनची अगदी देवाप्रमाणे पूजा करतात आणि मालिकेत मात्र या अन्नदेवतेचा अपमान केला जातोय.

मालिकेतील हे दृश्य पाहून अनेकांनी मालिकेवर बंदी घाला अशी मागणी केली आहे. झी वाहिनीनं देखील या दृश्याची गांभीर्यानं नोंद घेतली. अखेर अद्वैतनं या प्रकरणी सर्व प्रेक्षकांची माफी मागितली आणि यापुढे असे दृश्य पुन्हा दाखवली जाणार नाही असं आश्वासन अव्दैतनं संपूर्ण मालिकेतर्फे प्रेक्षकांना दिलं आहे.

हे ही वाचा-

बोंबील खाणाऱ्यांनो एकदा हे नक्की वाचा; डोळ्यांबाबतची ही माहिती असणे आहे खूपच गरजेचे

इंडिअन आयडल  शोवर भडकला अभिजित सावंत, म्हणाला टॅलंटपेक्षा गरिबी दाखवतात हे लोक

ज्यूनिअर एनटीआरच्या लग्नासाठी वडीलांनी खर्च केले १८ करोड; त्याच लग्नात पोलीस आले आणि एनटीआरला केली अटक

 


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: