खळबळजनक! कोरोना काळात चक्क शिवसेना आमदाराच्या कार्यालयात दारू वाटप, फोटो व्हायरल

May 25, 2021 , 0 Comments

ठाणे | देशात आणि राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनामुळे राज्यात भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक समाज घटकांना या काळात मदतीची मोठी गरज आहे. अशात ठाण्यात मात्र हस्यास्पद प्रकार समोर आला आहे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील वागळे परिसरातील नगरसेवकाने शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयात दारू वाटपाचा कार्यक्रम केला आहे. ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकाने चक्क मद्य वाटप केल्याने सर्वत्र छी थू होत आहे.

कोरोनाच्या या काळात अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्षातील कार्यकर्ते, मोठे व्यवसायिक गरजुंना मदत करत आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या या भीषण परिस्थितीचा सामना सर्वजण एकजूटीने करताना दिसतात. मात्र सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानेच प्रशासनाच्या कामावर पाणी फिरवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

नगरसेवकाने शिवसेना आमदारांच्या कार्यालयात केलेल्या दारू वाटपाच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला गेला आहे. याविरोधात स्थानिक समाजसेवक प्रकाश सुर्वे यांनी थेट ठाणे मनपा आय़ुक्त, ठाणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे. सुर्वे यांनी संबंधित नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमदार रवींद्र फाटक यांच्या खास मानल्या जाणाऱ्या नगरसेवकाने अशा प्रकारची बरीच कामे केली असल्याचे स्थानिक सांगतात. यामुळे असंवेदनशील नगरसेवकावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. या काळात लोकप्रतिनिधी आपल्या भागातील आणि शहरातील गरजूंपर्यंत अवश्य असणारी सर्व मदत पोहोचवणे गरजेचे आहे. मात्र याठिकाणी वेगळाच प्रकार घडताना दिसतो.

दरम्यान, या दारू वाटपाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामुळे पक्षाची मोठी बदनामी होत आहे. आता प्रशासन आणि पक्ष या नगरसेवकांवर कोणती कारवाई करते हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
मराठा आरक्षण राज्याचा विषय असे मोदींना वाटते, म्हणून ते संभाजीराजेंना भेटले नाहीत- चंद्रकांत पाटील
रामदेवबाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमधील वाद पेटला, रामदेवबाबांनी विचारले २५ प्रश्न
सचिन वाझेंचे शिवसेना मंत्री अनिल परबांशी संबंध; किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: