पारनेरचा भाजप नेता म्हणतो कोविड सेंटरमध्ये नृत्यांगणा नाचविल्या जातात ते कसे चालते?

May 25, 2021 , 0 Comments

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यात कोविड सेंटरमधील श्रेयवाद आणि महायज्ञा सारख्या गोष्टींवरून राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील पारनेरमधील भाळवणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार यांच्या नावे कोविड सेंटर सुरू केले आहे. ते राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे. यानंतर पारनेर तालुक्यातच माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या नावाने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी उभारलेल्या माजी आमदार वसंतराव झावरे कोविड केअर सेंटरमध्ये गेल्या आठवड्यात महायज्ञ करण्यात आला. याबद्द्ल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यानंतर सुजित झावरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

या पार्श्वभूमीवर सुजित झावरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनावर आत्तापर्यंत कुठल्याच प्रकारचे औषध सापडले नाही. जे चालू आहे ते अंदाजे चालू आहे. विज्ञानाला अध्यात्माची जोड देऊन जर कोरोना रुग्णांना समाधान मिळत असेल तर यज्ञ करण्यात काही गैर नाही.

पुढे ते म्हणाले, परमेश्वरावर श्रद्धा ठेवूनच हा यज्ञ करण्यात आला. गाईच्या दुधापासून बनविलेले तूप व गोवरी जाळल्यामुळे त्यातून ऑक्सिजनच बाहेर पडतो, हे विज्ञान सांगते. असे असून जिल्हाधिकाऱ्यांकडे महायज्ञबाबत तक्रार केली गेली आहे. कोविड सेंटरमध्ये महायज्ञ करणे ही अंधश्रद्धा नसून, तो एक श्रद्धेचा भाग आहे. या महायज्ञाचा कोणी चुकीचा अर्थ काढून आमच्या श्रद्धेला हात घालू नये. असा इशार झावरे यांनी दिला आहे.

पारनेर तालुक्यातच इतर कोविड सेंटरमध्येही वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. नृत्यांगणाही नाचविल्या जात आहेत, ते कसे चालते? असा सवाल सुजित झावरे यांनी उपस्थित केला. तसेच इतर सेंटरमध्ये प्रवचने व इतर कार्यक्रम होतात. त्याबद्द्ल कोणीच का बोलत नाही? असा सवाल झावरे यांनी केला.

आम्ही यज्ञ केल्यामुळेच कारवाईची मागणी होते. बाकी सेंटरबाबत अंनिस गप्प का आहे? यामागे काहीतरी राजकीय षड्ययंत्र आहे. असा आरोप झावरे यांनी यावेळी बोलताना केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेना आमदाराच्या कार्यालयात दारू वाटपाचा कार्यक्रम, फोटो व्हायरल झाल्यानंतर खळबळ
मराठा आरक्षण राज्याचा विषय असे मोदींना वाटते, म्हणून ते संभाजीराजेंना भेटले नाहीत- चंद्रकांत पाटील
आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी न करताही मिळणार लस, जाणून घ्या..


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: