शिक्षक अर्धनग्न अवस्थेत, विद्यार्थीनींवर लैंगिक कमेंट्स; ऑनलाइन क्लासमध्ये धक्कादायक घटना

May 25, 2021 , 0 Comments

कोरोनामुळे सध्या सगळीकडे ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र यामध्ये अनेकदा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक समोर आला आहे. चेन्नईमध्ये ऑनलाइन क्लासला एक शिक्षक अर्धनग्न अवस्थेत शिकवायला आल्याचे समोर आले आहे.

विद्यार्थ्यांवर लैंगिक स्वरुपाच्या कॉमेंट्स केल्याचाही आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. पद्म शेषाद्री बाल भवन स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही घटना घडली आहे. अनेक विद्यार्थी आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी ही बाब समोर आणली आहे.

राजगोपालन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लैंगिक हेतूने संभाषण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजगोपालन एका ऑनलाईन क्लासमध्ये फक्त टॉवेल गुंडाळून आले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या कपड्यांवर आणि व्हॉट्सअप प्रोफाईल पिक्चर्सवर कॉमेंट्स करणारे मेसेज पाठवले होते. विद्यार्थिनींच्या फोटोवर व्हेरी क्युट, त्यांच्या शरीररचनेवर आधारित कॉमेंट केल्या होत्या.

तसेच विद्यार्थिंनींना सिनेमा बघायला येणार का.? असेही त्यांनी विचारले होते. अगोदर देखील अनेकवेळा राजगोपालन यांच्याविरोधात शाळेच्या व्यवस्थापनाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. परंतु शाळेच्या व्यवस्थापनाने त्यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. येथील खासदार कनीमोझी यांनीदेखील ट्विट करून या प्रकरणाची दखल घेतली आहे.

यामुळे या शिक्षकाचे तात्काळ निलंबन करण्याची आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. शाळेने मात्र हा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले आहे. शाळेच्या व्यवस्थापनाकडे याआधी या आरोपांसंदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही, असे शाळेचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

ज्यूनिअर एनटीआरच्या लग्नासाठी वडीलांनी खर्च केले १८ करोड; त्याच लग्नात पोलीस आले आणि एनटीआरला केली अटक

मराठा आरक्षण राज्याचा विषय असे मोदींना वाटते, म्हणून ते संभाजीराजेंना भेटले नाहीत- चंद्रकांत पाटील

आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी न करताही मिळणार लस, जाणून घ्या..


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: