आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी न करताही मिळणार लस, जाणून घ्या..
नवी दिल्ली । देशात कोरोनाला रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लसीकरण देखील सुरु आहे. मात्र त्याला हवा तसा वेग येत नाही. अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा असल्याने लस उपलब्ध होत नाही. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. मात्र बुकींग करणे, स्लॉट ठरवणे यामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. आता सरकारने याबाबत मोठी घोषणा केली आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना कोणत्याही पूर्व नोंदणीशिवाय सरकारी लसीकरण केंद्रावर लस घेता येणार आहे.
याबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, आता १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांना लस घेण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. मात्र रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे.
तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केले असेल तर लस मिळू शकते. रजिस्ट्रेशन केले नसेल तर लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला लस दिली जाईल. ऑनलाइन अपॉइंटमेंट दरम्यान अनेक ठिकाणी लस वाया गेल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही सुविधा सध्या फक्त सरकारी लसीकरण केंद्रावरच उपलब्ध असेल. आतापर्यंत लसीकरण केंद्रावर ४५ वर्षांवरील लोकांनाच अपॉइंटमेंटशिवाय लस दिली जात होती. तर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन आणि ऑनलाइन स्लॉट बुकिंग करावे लागत होते.
यामुळे आता थेट लसीकरण होणार आहे. मात्र १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस अजुनही उपलब्ध होताना दिसत नाही. अनेकांनी दिवसभर लाईनमध्ये थांबून देखील लस मिळालेली नाही. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
ताज्या बातम्या
पप्पा माझं अफेयर नाही, कर्ज काढून माझं लग्न कराल मला मान्य नाही; चिठ्ठी लिहून मुलीची आत्महत्या
नोकरी सोडून तीन मित्रांनी केली ऑनलाइन पेट्रोल डिझेलची विक्री; वर्षात कमावले १०० कोटी
तब्बू, माधूरीसोबतच जाणून घ्या वयाची पन्नासी पार केलेल्या अभिनेत्रींचे फिटनेस रहस्य
0 Comments: