मुंबईकरांना मिळणार 'स्पुटनिक' लस?

May 25, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, सव्वा कोटी मुंबईकरांचे लसीकरण करण्यासाठी महापालिकेने मागवलेल्या एक कोटी लशींच्या जागतिक निविदेला (स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव) सोमवारपर्यंत चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या चारही कंपन्या रशियाच्या '' लशींचा पुरवठा करणार आहेत. लसीकरणासाठी पालिका तब्बल ७५० ते ८०० कोटी रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, निविदा भरण्याचा आज, मंगळवारी शेवटचा दिवस आहे. करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईकरांचे वेगवान लसीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी एक कोटी लशींची खरेदी करण्यात येणार आहे. मुंबईत आतापर्यंत ३० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले असून पहिल्या टप्प्यात एक कोटी व दुसऱ्या टप्प्यात आणखी काही लाख लसमात्रा खरेदी केल्या जाणार आहेत. लस खरेदीसाठी पालिकेने १२ मे रोजी पहिल्यांदा जागतिक निविदा मागवल्या होत्या. त्यात एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे १८ मेपासून आणखी एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली असून ती आज, २५ मे रोजी संपत आहे. निविदेला मुदतवाढ दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ मे रोजी रशियाच्या 'आरडीआयएफ'कडून स्पुटनिक लस पुरवठ्यासाठी तीन कंपन्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यापाठोपाठ २१ मे रोजी आणखी एका कंपनीने स्पुटनिकसाठी आपला प्रस्ताव दिला आहे. पालिकेला लसीकरणासाठी तब्बल ८०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज असून पुढील दोन महिन्यांत या कंपन्यांनी लस पुरवठा करण्याची हमी दिली आहे तर पालिकेने एक महिन्यात पुरवठा करण्याचा आग्रह धरला असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. प्रस्तावांमध्ये तांत्रिक अडथळे? पालिकेला आलेल्या पुरवठादारांच्या प्रस्तावांच्या कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक अडथळे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आरडीआयएफचे शिफारसपत्र, किती देशांना पुरवठा केला, त्याची माहिती यासह अन्य काही तपशीलवार माहिती पालिकेने पुरवठादारांकडून मागितली आहे. ही माहिती न मिळाल्यास पालिकेच्या निविदा नियमावलीत बदल करावे लागण्याची शक्यता आहे. पुरवठादार मुंबई महापालिकेकडून कोणतेही कमिशन घेणार नसून ते स्पुटनिक कंपनीकडून घेणार असल्याची माहितीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पालिकेच्या 'स्वारस्य अभिव्यक्ती' प्रस्तावाला चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून त्यांची छाननी करण्यात आली आहे. प्रस्ताव मागवण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस असून संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. संजोग कबरे, उपायुक्त, मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण, मुंबई महापालिका


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: