रामदेवबाबा आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमधील वाद पेटला, रामदेवबाबांनी विचारले २५ प्रश्न
नवी दिल्ली । योगगुरू रामदेव बाबा गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले आहेत. डॉक्टरांबाबत त्यांनी केलेले वक्तव्य त्यावरून देशातील डॉक्टर आक्रमक झाले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी आयएमएवर प्रश्नांचा भडीमार केला आहे.
एका पाठोपाठ एक असे २५ प्रश्न त्यांनी विचारले आहेत यावरून आता वाद वाढण्याची शक्यता आहे. याबाबत रामदेवबाबा यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे आयएमए या प्रश्नांना काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेले वादग्रस्त विधान त्यांनी मागे घेतल्याचे सांगितले होते. आता त्यांनी अॅलोपॅथी औषध कंपन्या आणि इंडियन मेडिकल असोसिएशला २५ प्रश्न विचारले आहे. काही आजारांवर ठोस उपाय आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
अॅलोपॅथीत उपचार इतके गुणकारी आहेत, तर अॅलोपॅथी डॉक्टरांनी आजारी पडणे योग्य वाटत नाही, असा टोलाही हाणला आहे. थायरॉइड, ऑर्थरायटीस, कोलायटिस, दमा आणि हेपेटायसिस यासारख्या आजारांवर त्यांनी २५ प्रश्न विचारले आहेत.
यामुळे त्यांनी माणसाला लागलेले ड्रग्सचे व्यसन सोडण्यासाठी काही औषध आहे का? शस्त्रक्रियेशिवाय रोज माणसाचे वजन अर्धा किलो कमी होईल असे औषध आहे का? इनलार्ज हार्ट आणि ईएफ कमी होण्यासाठी विना पेसमेकर काही उपाय आहे का?
डोकेदुखी, मायग्रेन यावर काही ठोस उपाय आहे का? इनलार्ज हार्ट आणि ईएफ कमी होण्यासाठी विना पेसमेकर काही उपाय आहे का? हार्ट ब्लॉकेज रिव्हर्स करण्यासाठी काय उपाय आहे का? बायपास, अँजिओप्लास्टी न करता उपचार आहेत का?
अॅलोपॅथीत उच्च रक्तदाबावर कायमस्वरुपी औषध आहे का.? थॉयरॉइड, आर्थरायटिस, कोलायटिस, अस्थमा यासारख्या आजारांवर ठोस उपाय आहे का? फॅटी लिवर सिरॉसिस, हेपेटायटिसचे औषध आहे का? आता अॅलोपॅथी उपचारांना २०० वर्षे झाली आहेत. टाइप-१ आणि टाइप-२ डायबिटीजवर कायमस्वरुपी औषध आहे का?
अशाप्रकारे रामदेवबाबा यांनी प्रश्नांचा भडिमार केला आहे. याबाबत त्यांनी हे प्रश्न ट्विट करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
ताज्या बातम्या
आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी न करताही मिळणार लस, जाणून घ्या..
पप्पा माझं अफेयर नाही, कर्ज काढून माझं लग्न कराल मला मान्य नाही; चिठ्ठी लिहून मुलीची आत्महत्या
पतीचं ११ हजार बील भरण्यासाठी पत्नीकडे नव्हते पैसे; रुग्णालयाने मंगळसुत्रचं घेतलं ठेवून
0 Comments: