या अभिनेत्रीवर होते करण जोहरचे प्रेम, नंतर तिनेच केले करणच्या खास मित्रासोबत लग्न

May 26, 2021 , 0 Comments

धर्मा प्रोडक्शनचे सर्वेसर्वा यश जोहर यांचा करण जोहर हा मुलगा आहे. करण जोहर बॉलिवूडचा एक प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक आहे. करणची बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वच कलाकारांसोबत चांगली ओळख आहे. मात्र त्याच्या आयुष्यात काही खास गोष्टी घडल्या आहेत.

करण जोहरने वयाची ४९ वर्षे पुर्ण केली आहेत. परंतु त्याने लग्न केले नाही. त्याच्या लग्न न करण्याच्या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटते. करण जोहरचे एकेकाळी एका अभिनेत्रीवर प्रचंड प्रेम होते. याच अभिनेत्रीमुळे करणने आतापर्यंत लग्न केलं नसल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये वेळोवेळी रंगताना दिसतात.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक असे स्टार किड आहेत. जे लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. अशीच एक जोडी म्हणजे निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना. वेळोवेळी दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से इंडस्ट्रीमध्ये सांगितले जातात.

ट्विंकल आणि करण लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघे एकाच शाळेमध्ये शिकत होते. त्यामूळे त्यांची मैत्री चांगलीच घट्ट आहे. करणला ट्विंकल खूप आवडायची आणि त्याला तिच्यासोबत लग्न देखील करायचे होते. ही गोष्ट ट्विंकलचा पती अभिनेता अक्षय कुमारला देखील माहीत आहे.

अक्षयने कॉफी विथ करण या कार्यक्रमात करणची यासंदर्भात खिल्ली उडवली होती. तसेच ट्विंकलने एका पुस्तकात तिच्या आणि करणच्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ट्विंकलने सांगितले की, करण जोहरला मी खुप आवडायचे. मी करणची क्रश होते. त्यामूळे करण नेहमी माझ्या मागे मागे फिरायचा. जी गोष्ट मला खुप मजेदार वाटायची’.

करणचा पहिला चित्रपट कुछ कुछ होत है यामध्ये टीना ही भूमिका ट्विंकलने करावी असे करणला वाटत होते. मात्र ट्विंकलने या भूमिकेसाठी नकार दिला. खास म्हणजे ट्विंकलला सगळे टीना या नावानेच हाक मारत असल्याने या चित्रपटात नायिकेचे नाव टीना ठेवले होते.

कुछ कुछ होता है या चित्रपटाला प्रेक्षाकांनी डोक्यावर घेतले. करणला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिले नाही. लगेचच पुन्हा कभी खुशी कभी गम या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आज करण बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे.

महत्वाच्या बातम्या-
“प्रियंका व कंगनाला भेट देणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही; हा महाराष्ट्राचा अवमान”
‘छु कर मेरे मन को’ ह्या गाण्यावर भडकले होते अमिताभ बच्चन; राजेश रोशन यांनी सांगितला भन्नाट किस्सा
१०+१० चाळीस? समोसे विकणाऱ्या लहान मुलाचा निरागस युक्तीवाद; व्हिडीओ पाहून लोटपोट व्हाल


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: