मोठी बातमी! आता कोविड सेंटरमध्येच दाखल व्हावे लागणार, होम आयसोलेशन बंद, आरोग्यमंत्र्यांची माहिती

May 26, 2021 , 0 Comments

मुंबई । देशात कोरोना रुग्णांचा आकडा अजूनही कमी होत नाही. राज्यात देखील कोरोनारुग्ण अजूनही सापडत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी जी परिस्थिती होती ती आता आटोक्यात आली आहे. असे असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक मोठी घोषणा केली.

काही दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. लक्षणे दिसून आली नाहीत, तरी हा निर्णय लागू असणार आहे.

आता रुग्णाला कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. त्यांनी राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.

यामुळे आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे कोविड सेंटरची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. रुग्णांचा आकडा वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे घरात कोरोनाचा फैलाव होणार नाही. एका व्यक्तीमुळे घरातील इतरांना कोरोना होत असल्याच्या घटना समोर येत होत्या.

सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असेही राजेश टोपे म्हणाले. यामुळे आता कोरोना झाला की कोविड सेंटरमध्येच राहावे लागणार आहे. घरी असलेले रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या अनेक तक्रारी देखील येत होत्या.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

२०११ च्या विश्वचषकाच्यावेळी भारतीय संघावर या कारणामुळे होता राजकीय दबाव, वाचा पुर्ण किस्सा

राजीव गांधींचा तो गोल्ट मेडलीस्ट मारेकरी जो जेलमध्ये अभ्यास करून झाला इंजिनिअर, १२ वीचा आहे टॉपर

तौक्तेपेक्षाही खतरनाक आहे यास चक्रीवादळ; महाराष्ट्रातील ‘या’ भागाला बसू शकतो फटका


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: