“गडकरी आणि राजनाथ होते तेव्हा भाजप वेगळी होती, आता अमित शहांमुळे भाजपमध्ये मोठे बदल झाले”
उत्तराखंडमधील ५१ मंदीरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी घेतला आहे. आता या निर्णयाचे भाजप खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी स्वागत केले आहे.
सुब्रमण्यन स्वामी यांनीच मंदीरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त व्हावी, यासाठी आवाज उठवला होता. आता भाजपचे भविष्य दुसऱ्यापक्षांपेक्षा जास्त उज्जवल आहे, असे ट्विट सुब्रमण्यन यांनी केले आहे. तसेच अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर पक्षात खुप बदल झाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
एका ट्विटर युजरने उत्तराखंडच्या ५१ मंदीरांना सरकारी नियंत्रणापासून मुक्त केल्याच्या निर्णयाचे पुर्ण श्रेय सुब्रमण्यन स्वामी यांना दिले आहे. त्यामध्ये त्याने, राज्य सरकारने आपली चुक सुधारली आहे, असेही म्हटले होते.
त्या ट्विटर युजरच्या ट्विटला रिप्लाय देत, याच कारणामुळे भाजपचे भविष्य दुसऱ्यापक्षांपेक्षा उज्जवल आहे, जेव्हा गडकरी आणि राजनाथ अध्यक्ष होते, तेव्हा आम्ही फोरममध्ये बोलायचो, पण अध्यक्ष जेव्हा अमित शहा अध्यक्ष झाले. तेव्हा सर्व गोष्टी बदलल्या, असे सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी शुक्रवारी एक मोठा निर्णय घेतला होता, त्यामध्ये उत्तराखंडमधल्या ५१ प्रमुख मंदीरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त केले जाणार आहे. या मंदीरांमध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री सारख्या मोठ्या मंदीरांचा समावेश आहे.
0 Comments: