फक्त ४७ रूपयांत २८ दिवस अनलिमीटेड कॉलिंग आणि रोज १ जीबी डेटा देत आहे ही कंपनी

April 10, 2021 , 0 Comments

जर तुम्हाला कमी पैशात रोज एक जीबी डेटा आणि महिनाभर अनलिमिटेड कॉलिंग हवे आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बएसएनएलने नुकताच आपला सर्वात स्वस्त प्लॅन सादर केला आहे.

हा प्लॅन सर्वात स्वस्त प्लॅन मानला जात आहे कारण हा फक्त ४७ रूपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकाला २८ दिवस अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. याचसोबत तुम्हाला रोज १०० एसएमएससुद्धा मिळणार आहेत.

बीएसएनएलचा हा छोटा रिचार्ज दुसऱ्या टेलिकॉम कंपन्या म्हणजे एअरटेल, आयडीयाशी स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे. अनेक लोक याला बीएसएनएलचा मास्टरस्ट्रोक बोलत आहेत. जर तुम्ही दुसऱ्या कंपन्यांच्या रिचार्जवर नजर टाकली तर प्रायवेट टेलिकॉम कंपनी एअरटेल ११० रूपयांपेक्षा कमी किंमतीत दोन प्रिपेड प्लॅन देत आहे.

त्यांच्या पहिला प्लॅन ७९ रूपयांचा आहे आणि दुसरा प्लॅन ४९ रूपयांचा आहे. या दोन्ही प्लॅन्समध्ये युजरला फक्त २०० एमबी डेटा मिळतो. तर दुसरीकडे जीओने ५१ आणि २१ रूपयांचे दोन नवीन प्लॅन्स बाजारात आणले आहेत. पण हे दोन्ही टॉप अप प्लॅन्स आहेत ज्यामध्ये वॅलिडीटी मिळत नाही.

याचप्रकारे वॉडाफोन-आयडियासुद्धा ४८ रूपये आणि ९८ रूपयांचे दोन प्लॅन्स ऑफर करत आहे. पण याच्यामध्येसुद्धा फायदे मर्यादित आहेत. त्यामुळे बीएसएनएलने जो प्लॅन बाजारत आणला आहे त्यामुळे बाकीच्या टेलिकॉम कंपन्यांना तगडी टक्कर मिळणार आहे असे बोलले जात आहे.

भलेही बीएसएनएलचे जास्त ग्राहक नसतील पण त्यांनी जर असेच स्वस्त प्लॅन्स बाजारात आणले तर ते बाकीच्या कंपन्यांना तगडी टक्कर देऊ शकतात. बीएसएनएलने असे बरेच प्लॅन बाजारात आणले आहेत. त्यांचे खुप स्वस्त प्लॅन्स आहेत ज्यामुळे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत.

महत्वाच्या बातम्या
“गडकरी आणि राजनाथ होते तेव्हा भाजप वेगळी होती, आता अमित शहांमुळे भाजपमध्ये मोठे बदल झाले”
महिमा चौधरीचा दोन वेळा झाला होता गर्भपात; म्हणाली वैवाहिक जीवनात नव्हते सुखी
प्रसंग बाका आहे, सरकार कोणाचे आहे पाहू नका, फडणवीसांनी दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी
पहिल्या शोसाठी दया भाभीचे मानधन ऐकून धक्का बसेल


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: