अमेरीका युरोपने सिरमला कच्च्या मालाचा पुरवठा थांबवला; मोदीजी तुम्ही लक्ष घाला-रोहीत पवार
कोरोनासाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर सगळ्यांनाच आनंद झाला होता. मात्र लसीचा तुटवडा हा आता चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात आता अशी माहिती समोर आली आहे की कोरोना लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचाही तुटवडा जाणवत आहे. आदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे.
अमेरिका आणि युरोपमधून कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल येतो. मात्र त्यांनी त्यांचा पुरवठा थांबवल्याने सिरम इन्स्टिट्युटला कच्चा माल मिळवताना मोठ्या अडचणी येत आहेत, असं आदर पुनावाला म्हणाले आहेत. त्यामुळे पुर्ण देशातील कोरोना लस निर्मितीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.
आदर पुनावाला यांनी अमेरिका आणि युरोपकडून लवकरात लवकर कच्च्या मालाचा पुरवठा करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मला शक्य असतं तर मीच स्वता अमेरिकेत गेलो असतो आणि अमेरिकेच्या धोरणांचा निषेध केला असता असे आदर पुनावाला म्हणाले आहेत.
जगभरातील कोरोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांसाठी हा माल आवश्यक आहे, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, आता हा कच्चा माल मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे. त्यांनी आदर पुनावाला यांना मदत करण्याची विनंती मोदींना केली आहे.
त्यांनी ट्वीट केले आहे की, कोविडच्या लसीसाठी कच्च्या मालाचा पुरवठा युरोपातील काही देश आणि अमेरिकेने थांबवल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिली आहे. सध्या लस उत्पादनात घट होणं आपल्याला परवडणारं नाही, त्यामुळे याबाबत आपण लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, ही विनती! असं ट्वीट त्यांनी केले आहे.
कोविडच्या लसीसाठीच्या कच्च्या मालाचा पुरवठा युरोपातील काही देश आणि अमेरिकेने थांबवल्याची माहिती @SerumInstIndia चे CEO @adarpoonawalla यांनी दिली. सध्या लस उत्पादनात घट होणं हे आपल्याला परवडणारं नाही. त्यामुळं याबाबत आपण लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, ही विनंती!@PMOIndia
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 10, 2021
महत्वाच्या बातम्या
प्रसंग बाका आहे, सरकार कोणाचे आहे पाहू नका, फडणवीसांनी दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी
पहिल्या शोसाठी दया भाभीचे मानधन ऐकून धक्का बसेल
नियमित एक ग्लास कोमट दुधात गुळ टाकून पिल्याने होतात हे आश्यर्यकारक फायदे
नियमित एक ग्लास कोमट दुधात गुळ टाकून पिल्याने होतात हे आश्यर्यकारक फायदे
0 Comments: