महिमा चौधरीचा दोन वेळा झाला होता गर्भपात; म्हणाली वैवाहिक जीवनात नव्हते सुखी
अभिनेत्री महिमा चौधरीने १९९७ मध्ये बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. माहीमच्या अभिनयाने तसेचे तिच्या सौदर्याने अनेकांच्या मनात घर केले आहे.परंतु २०१० नंतर अभिनेत्री महिमा चौधरी चित्रपटांमध्ये दिसली नाही. महिमा कधी तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलत नाही पण इतक्यातच झालेल्या इंटरव्यूमध्ये तीने कसे तिचे आयुष्य आणि करियर चुकीच्या लग्नामुळे बरबाद झालेले सांगितले.
‘ परदेस ‘ मधून फिल्म इंडस्ट्री एन्ट्री करणारी महिमा चौधरी अनेक हिंदी पिक्चर मध्ये डेब्यू करत होती.महिमा चौधरीने या इंटरव्यू मध्ये सांगितले की अजय देवगणशी अफेयरची अफवा पसरल्यामुळे पूर्ण करियर बरबाद झाले. अजय देवगण आणि काजोलचे लग्न झाले पण महिमा चौधरी मात्र फिल्म इंडस्ट्रीपासून दुरावली गेली.
महिमा चौधरी या इंटरव्यू मध्ये तिच्या मोडलेल्या लग्नाविषयी मनमोकळेपणाने बोलली. ज्यात तिने सांगितले की दुर्दैवाने तिचे लग्न बॉबी मुखर्जी सोबत झाले.महिमा आणि बॉबीने २००६ मध्ये लग्न केल आणि २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिचे दोन वेळा गर्भपात झाले.त्यांना एरियाना नावाची एक मुलगी आहे. तसेच करीयरच्या सुरवातीलाच तिचा एक भीषण अपघात झाला होता.
महिमा चौधरीला आपले खाजगी आयुष्याबद्दल कुटुंब आणि मित्र परिवार यांना सांगायला आवडत नाही. तीच अस मत आहे की आपण आपली दुख: आई-वडिलांना किवा मित्र परिवाराला सांगू शकत नाही कारण तो आपला खाजगी मुद्दा असतो. पहिल्या बाळानंतर तिला दुसऱ्या बाळाची ओढ होती पण त्यानंतर तिच दोन वेळा गर्भपात झाला कारण ती तिथे खुश नव्हती. तिला तिच्या आईच्या घरी घरी सुरक्षित वाटायचे असा खुलासा तिने केला.
महिमाने सांगितले की त्याकाळी घटस्फोट घेण म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. खूप साऱ्या अफवा पसरल्या असत्या. पण त्यांनी एक दिवस लग्नाविषयीच्या सर्व समस्या आईजवळ सांगितल्या. महिमाच्या आईने तिला पाठींबा दिला आणि सगळ्या संकटातून बाहेर येण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी तिला काही दिवस सगळ्यापासून लांब राहण्याचे सुचवले होते. तसेच सगळ्या संकटावर मात करण्याची हिम्मत दिली होती.
महिमा चौधरी पुढे सांगते की, जेव्हा कठीण प्रसंग माझ्यावर आला तेव्हा नवऱ्याने मला साथ दिली नाही. जेव्हा गर्भपात झाला तेव्हाही नवऱ्याने साथ दिली नाही. २०१३ मध्ये बॉबी आणि महिमा यांचा घटस्फोट झाला, त्यानंतर महिमा एकटीच एरियानाचा सांभाळ करत आहे.
0 Comments: