प्रसंग बाका आहे, सरकार कोणाचे आहे पाहू नका, फडणवीसांनी दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी
राज्यात कोरोनाचे संकट पाय पसरत चालले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता रुग्णांना बेड मिळत नाहीये, आरोग्यसेवा मिळत नाही. असे असताना विरोधी पक्ष आणि राज्य सरकार एकमेकांवर टिका केली करत आहे.
आता कोरोनामुळे राज्याची परिस्थिती बिघडत आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीकडून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यात ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता जाणवत आहे. हा प्रसंग बाका आहे, अशा परिस्थितीत विरोधकांनी फाटे फोडता कामा नये, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. शेवटी ते देखील महाराष्ट्राचे नेते आहेत असे संजय राऊतांनी म्हटले आहे. शनिवारी ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
कोरोनाच्या स्थितीत सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. पुढच्या काही काळासाठी राजकीय अडीअडचणींचे प्रश्न बाजूला ठेवले पाहिजे, सगळ्यांनीच कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले पाहिजे, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्राने पुण्याला लस देण्याचा निर्णय घेतला आहे, असे पुण्याचे भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपुर्ण देशाचे पंतप्रधान आहे. त्यामुळे आमचे तुमचे सरकार आहे, हे बघून निर्णय घेऊ नये. भाजपच्या महापौरांसाठी केंद्र सरकार वेगळा नियम लावत असेल, तर हा उर्वरित महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या शोसाठी दया भाभीचे मानधन ऐकून धक्का बसेल
पुण्याला केंद्राकडून नाही, तर राज्य सरकारकडून मिळाल्या कोराना लसी; महापौरांचा ‘तो’ दावा खोटा?
धक्कादायक! बॉलीवूड दिग्दर्शकाच्या पत्नी आणि मुलीची आत्महत्या; घरात घेतले जाळून
0 Comments: