कोरोनात राज्याच्या मदतीसाठी पुणेकर उद्योगपती आला धावून, परदेशातून आणणार ३५०० व्हेंटिलेटर्स

April 25, 2021 , 0 Comments

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातही कोरोनाची रोज हजारो प्रकरणे समोर येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. तसेच रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या अशा संकटात आता एक पुणेकर उद्योजक देशाच्या मदतीला धावून आला आहे. पुण्यातील उद्योजक सुधीर मेहता यांच्या सहकार्याने सिंगापुरमधून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि व्हेंटिलेटर एअर लिफ्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

सुधीर मेहता यांच्या सहकार्याने सिंगापुरमधून आठ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि साडेतीन हजार व्हेंटिलेटर एअर लिफ्ट करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोष्टींसाठी परवानगी दिली आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवड्याची कोरोना आढावा बैठक शुक्रवारऐवजी सोमवारी घेतली होती. या बैठीकीतील चर्चेसंदर्भात चंद्रकात पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

सुधीर मेहता पुण्यातील आरोग्य व्यवस्था अपग्रेड करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांनी मागील वर्षांमध्ये जवळपास २०० कोटी उभे केले आहेत. सिंगापुरमध्ये काही आरोग्य विषय साहित्य उपलब्ध आहे. यामध्ये त्यांना आठ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि साडेतीन हजार असल्याचे सांगितले आहे.

तसेच सिंगापुर सरकारचा एक कॉर्पोस फंड आहे. हा जगातील सर्वात मोठ्या चॅरीटी फंडपैकी एक आहे. सिंगापुर सरकारने उद्योगपती मेहता यांना ऑफर दिली आहे, की ५० टक्के रक्कममध्ये आम्ही तुम्हाला हे देतो. तुम्ही फक्त न्यायची व्यवस्था करा, असे मेहतांना सांगण्यात आले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पतीच्या निधनानंतर एकट्या पडल्या आहेत विजेता पंडित; झाली आहे ‘अशी’ अवस्था
भारतात भितीदायक कोरोना, तरीही आयपीएल सुरू, तुम्हाला काही वाटत नाही का? गिलख्रीस्टने सुनावले
भारीच! आता कोरोना काळात हे पाच पेय प्या आणि झटपट आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवा


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: