पतीला बेड, ऑक्सिजन मिळाला नाही; पत्नीने रिक्षातच तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न केला; अखेर….

April 25, 2021 , 0 Comments

आग्रा | देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लस, बेड, ऑक्सिजन यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. उपचार वेळेवर मिळत नसल्याने रुग्णांना जीव गमवावे लागत आहेत.

देशात कोरोना रुग्णांचे अत्यंत धक्कादायक तऱ्हेने मृत्यू होत असल्याचं चित्र समोर येत आहे. देशात प्रत्येक राज्यांमध्ये कोरोनाने भीषण मृत्यूच्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेश राज्याच्या आग्रा शहरातही अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

आग्रा शहराच्या विकास सेक्टर सातमध्ये रवि सिंघल आपल्या कुटूंबासह राहतात.  रवि आजारी पडले होते. त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यामूळे त्यांच्या पत्नी रेणू पतीला रुग्णालयात घेऊन जाण्यास निघाल्या.

रिक्षा बोलावून त्यांनी पतीला मांडीवर झोपवून शहरातील साकेत हॉस्पीटल, केजी नर्सिंग होम, श्रीराम हॉस्पीटलमध्ये भरती करण्यासाठी घेऊन गेल्या. मात्र रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना बेड, ऑक्सिजन मिळाला नाही. इकडे रेणू यांच्या पतीची प्रकृती जास्तच खराब होत चालली होती.

रेणू यांच्या पतीला श्वास घेण्यास त्रास होत होता.  पतीचा जीव वाचवण्यासाठी रेणू यांची धडपड सुरू होती. रिक्षामध्येच पतीला तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न रेणू करत होत्या. त्यानंतर एसएस मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी रवी यांना तपासले. मात्र तोपर्यंत खुप उशीर झाला होता.

रेणू यांच्या पतीचा वेळेत उपचार न झाल्याने मृत्यू झाला. पतीचं निधन झालं असल्याचं समजताच रेणू यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पतीचा जीव वाचवण्यासाठी रेणू यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.

दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात ३ लाख ४६ हजार ७८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची आजवरची एकूण संख्या १ कोटी ६६ लाख इतकी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनात राज्याच्या मदतीसाठी पुणेकर उद्योगपती आला धावून, परदेशातून आणणार ३५०० व्हेंटिलेटर्स
महाराष्ट्रदिनी राज्याला मिळणार मोफत लसींचं मोठं गिफ्ट; अजित पवारांनी दिले संकेत
‘आम्ही सगळं काही करतो तुम्ही फक्त परवानगी द्या’; भारताच्या मदतीला पाकिस्तान सरसावला


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: