कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच असतात का.? आता रोहित पवारांच्या सभेत तुफान गर्दी
पंढरपूर । कोरोनामुळे राज्य सरकारने अनेक नियम व अटी जारी केल्या आहेत. मात्र त्या फक्त सर्वसामान्य लोकांनाच लागू आहेत का.? असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. राजकीय नेत्यांना वेगळे नियम आहेत का.? हा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांना पडला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये निवडणूक प्रचार करताना कोरोना नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्या सभेला तुफान गर्दी बघायला मिळाली. यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार का.? असा प्रश्न विचारला जात आहे.
या सभेमध्ये बोलताना रोहित पवार यांनी लॉकडाऊन लागल्यास सरकारने सर्वसामान्यांची काळजी घ्यावी, असे वक्तव्यही केले. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत देखील सर्व नियम मोडले गेले होते. यामुळे आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.
पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. कोरोनाचे नियम झुगारून मोठ्या राजकीय सभा होत आहेत. काल रोहित पवार यांची देखील सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत.
पंढरपूरच्या कालिका चौकात ही सभा झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे आता त्यांच्यावर टीका केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. यामुळे सरकारने लोकांना नियम लागू केले आहेत.
0 Comments: