आता घरबसल्याच जोडा रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव; वाचा सोपी पद्धत…

April 11, 2021 , 0 Comments

 

एका सामान्य कुटुंबाला रेशन कार्डच्या अनेक फायदे आहे. त्यामध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी किंमतीत धान्य मिळणे. रेशन कार्ड हे फक्त खाजगी कामासाठीच नाही, तर शासकीय कामासाठी पण एक महत्वाचे कागदपत्र आहे.

अनेकदा आपल्याला रेशन कार्डमध्ये बदल करायचे असतात, तसेच एखादा नवीन सदस्य कुटुंबात सामील झाला तर त्याचे नाव जोडणे गरजेचे असते, पण बऱ्याचवेळा आपल्याला त्या कार्यालयात जाणे शक्य होत नाही, तर तुम्ही घरबसल्या कसे नव्या सदस्याचे नाव जोडू शकता, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

तसेच रेशन कार्डमध्ये असलेली माहिती म्हणजेच नाव, पत्ता अशी काही माहिती चुकीच्या पद्धतीने लिहली गेली असेल किंवा चुकीची असल्यास ती माहितीही तुम्ही घर बसल्या बदलू शकतात.

रेशनकार्डमध्ये नवीन नाव जोडायचे असेल तर त्या व्यक्तीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक ती सुधारणा आधारकार्डमध्ये करणे गरजेचे आहे. म्हणजेच एखाद्या मुलीने लग्नानंतर आपले आडनाव बदलले, तर तिला आपल्या आधारकार्डमध्ये पतीचे नाव लावणे गरजेचे आहे.

तसेच नवीन पत्ता लावणे गरजेचे आहे, त्यानंतर नवीन आधारकार्डचा तपशील पतीच्या क्षेत्रात उपस्थित अन्न विभाग अधिकारी यांना द्यावा लागेल. तसेच तुम्ही ऑनलाईन पडताळणीनंतरही आपण नवीन सदस्याचे नाव जोडू शकतात. त्यासाठी तुम्हाला जुन्या रेशनकार्डमधून नाव काढून नवीन रेशनकार्डमध्ये टाकण्यासाठी अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला नंबर नोंदवणे गरजेचे आहे.

जर तुमचा मोबाईल नंबर रेशनकार्डला लिंक केलेला नसेल तर जो लिंक करण्यासाठी तुम्हाला https://ift.tt/3t8eP5T या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. याठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लिंक करु शकतात, या ठिकाणी तुम्हाला आधारकार्ड नंबरची आवश्यकता असते.

तसेच या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचा आधार नंबर विचारला जाईल, ज्या वक्तीच्या नावावर रेशन कार्ड आहे ती व्यक्ती. पुढे तुम्हाला रेशनकार्ड नंबर लिहावा लागेल. तिसऱ्या कॉलममध्ये घराच्या प्रमुखांचे नाव आणि नंतर मोबाईल नंबर, तुम्ही हे करताच तुमचा मोबाईल नंबर नोंदावला जाईल.

महत्वाच्या बातम्या-

आमिर खानसारख्या पतीसोबत राहणे कठिण झाले आहे; पत्नी किरण रावचा खुलासा

बेड न मिळाल्यामुळे उपचाराअभावी प्रसिद्ध डॉक्टरच्या वडीलांचाच कोरोनाने मृत्यू; दुर्दैवी घटनेने हळहळ

लाॅकडाऊन केला तर लोकांना आर्थिक मदत करा, अन्यथा उद्रेक होईल; फडणवीसांचा इशारा


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: