संपुर्ण राज्यात लॉकडाऊन झाल्यास शहरातून गावी जाण्यास परवानगी मिळणार.? वाचा सविस्तर
मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. असे असताना आज लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार आहेत.
यामुळे जर लॉकडाऊन लागले तर शहरात अडकलेल्या लोकांना गावी जाण्याची मुभा मिळणार का.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे अनेकांचे मोठे हाल झाले.
यामुळे आतातरी लॉकडाऊनचा निर्णय अचानक घेऊ नये, अशी मागणी अनेकजण करत आहेत. अनेक कामगार आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शहरात येत असतात. मात्र काम लॉकडाऊनमुळे काम नसल्याने त्यांना आता उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न पडला आहे.
यामुळे या कामगारांनी आता गावाची वाट धरली आहे. मात्र जर अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले तर त्यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.
यामुळे संपूर्ण लॉकडाऊन लागल्यास शहरातून गावाकडे जाण्यास मुभा मिळणार का.? अशी मागणी अनेक स्थरातुन केली जात आहे. आता आज लॉकडाऊन होणार की नाही, झाला तर तो कशाप्रकारे असेल याचा निर्णय होणार आहे. याबाबत काल संकेत दिले गेले आहेत.
0 Comments: