पैशांची कमी नाही तरी या गावातील लोक कपडेच घालत नाहीत, पर्यटकांनाही कपडे काढूनच जावे लागते
जगात काय होईल काहीही सांगता येत नाही. काही ठिकाणी अनेक प्रथा परंपरा असतात. या प्रथांबद्दल जर तुम्ही वाचलं तर तुमचेही डोके चक्रावून जाईल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका परंपरेबद्दल सांगणार आहोत. ब्रिटनमधील गावात एक परंपरा आहे.
त्याबद्दल वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणे अवघड होईल. कारण ब्रिटनमधील या गावातील लोक कपडेच घालत नाहीत. तुम्हाला वाटेल या गावातील लोकांकडे पैसे नसतील किंवा ते गरिबीमुळे कपडे घालत नसतील पण तसं काहीही नाहीये.
या गावातील लोकांकडे पैशांची कमी नाहीये पण तरीही ते लोक कपडे घालत नाहीत. युरोपच्या ब्रिटनच्या हर्टफोर्डशायर येथील स्पिलप्लाट्झ असे त्या गावाचे नाव आहे. या गावातील लोक गेल्या ८५ वर्षांपासून कपडेच घालत नाहीत.
या गावातील लोक सुशिक्षित आहेत आणि त्यांच्याकडे आर्थिक दृष्ट्या खूप पैसे आहेत. मात्र गावातील पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले कोणीच कपडे घालत नाही. ते बिना कापड्यांचेच सगळीकडे वावरतात.
असं करताना त्यांना काहीच लाज वाटत नाही. या गावाचा शोध इसुल्ट रिचर्डसन याने १९२९ मध्ये लावला होता. त्यांनी झगमगत्या जीवनापासून लांब जाऊन एका गावात जाण्याचे ठरवले. गावामध्ये स्विमिंग पूल, क्लबची व्यवस्था आहे.
जे पर्यटक गाव पाहायला येतात त्यानांही कपडे न घालताच गावात प्रवेश करावा लागतो. पण जर गावातील लोकांना काहीतरी खरेदी करण्यासाठी शहरात जायचे असेल तर त्यांना कपडे घालण्याची मुभा आहे. पण परत येताना कपडे न घालता गावात प्रेवेश करावा लागते.
ज्यावेळी कडाक्याची थंडी पडलेली असते तेव्हा या लोकांना कपडे घालण्याची मुभा असते. कोणत्याही व्यक्तीला संकटात कपडे घालायचे असतील तर त्यांना कपडे घालण्याची मुभा आहे. आता लोकांना या परंपरेची सवय झाली आहे. त्यांना याबाबत काहीच वाटत नाही. काही सामाजिक संस्थांनी याचा विरोध केला होता पण नंतर त्यांनी विरोध करायचे सोडून दिले.
महत्वाच्या बातम्या
सचिन वाझेला पुढची भाजपची खासदारकी पक्की; अमोल मिटकरींनी केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
“महाराष्ट्र पेटला म्हणून टाळ्या वाजवू नका, निवडणूका असलेल्या ५ राज्यातही कोरोना पेटणार आहे”
“दारूची दुकाने उघडी, पण कोणी काही विकत बसलं तर त्याला काठ्या, काय चावटपणा चालला आहे”
0 Comments: