मधल्याकाळात माझा ट्रॅक चुकला होता, पण आता पुर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करणार- कल्याणराव काळे
पंढरपुरचे आमदार भारत नाना भालके यांचे २८ नोव्हेंबर २०२० मध्ये निधन झाले होते, आता त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
या निवडणूकीचे मतदान १७ एप्रिलला होणार आहे, तर २ मेला मतमोजणी होणार आहे, यामध्ये राष्ट्रवादीने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणूकीत मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होणार असून आता निवडणूकी आधीच भाजपला एक मोठा धक्का बसला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. फक्त दोन वर्षांच्या कार्यकाळाने कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.
विठ्ठल परिवार एकत्र पाहिजे, भविष्यात परीवाराची ताकद विरोधकांना दाखवली पाहिजे. मधल्याकाळात माझा ट्रॅक चुकला होता, आता सगळा जिल्हा राष्ट्रवादीमय करणार. पवार साहेबांची ताकद कायमस्वरुपी आमच्या पाठीशी असते, असे पक्षप्रवेश करताना कल्याणराव काळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पोटनिवडणूकी आधी कल्याणराव काळे यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. कारण सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पुर्ण गट आता राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
सचिन वाझेला पुढची भाजपची खासदारकी पक्की; अमोल मिटकरींनी केले ‘हे’ प्रश्न उपस्थित
आपल्या सासरच्या माणसांसोबत ऐश्वर्या रायचे आहेत ‘असे’ संबंध; ननंद श्वेतासोबत असे बॉण्ड करते शेअर
“महाराष्ट्र पेटला म्हणून टाळ्या वाजवू नका, निवडणूका असलेल्या ५ राज्यातही कोरोना पेटणार आहे”
0 Comments: