“सचिन वाझे प्रकरणात माझीही चौकशी करा आणि दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या”

April 09, 2021 , 0 Comments

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकल्यानंतर आता निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनीही लेटरबॉम्ब टाकला आहे. या पत्रात त्यांनी असा आरोप केला आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर येण्यासाठी २ कोटींची मागणी केली होती.

तर त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. वाझेंनी असा आरोप केला आहे की एसबीयुच्या ट्रस्टींकडून अनिल परब यांनी ५० लाख रूपये मागितले. त्यांनी असाही आरोप केला आहे की जानेवारी २०२१ ला मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रूपये जमा करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या होत्या.

याच पत्रात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. वाझेंच्या म्हणण्यानुसार २०२० मध्ये दर्शन घोडावट नावाचा व्यक्ती जो अजित पावारांच्या अत्यंत जवळचा आहे त्याने माझी भेट घेतली होती.

घोडावट यांनी मला माहिती दिली होती की महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे गुटखा व तंबाखूचा पुरवठा सुरू आहे. त्यांनी सांगितले हा व्यापार कोटींमध्ये आहे. त्यातून मला महिन्याला १०० कोटी रूपये जमा करण्यास सांगितले. त्यावेळी मी असं काहीही करण्यास नकार दिला होता.

माझ्या नकारानंतर घोडावट यांनी पुन्हा नोकरी जाण्याची धमकी दिली होती. सचिन वाझे प्रकरणात अनिल देशमुखांचे नाव आल्यानंतर आता अजित पवारांचे नाव आल्याने खळबळ माजली आहे. पण अजित पवारांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

त्यांनी असे खुले चॅलेंज दिले आहे की या प्रकरणी माझी कोणतीही चौकशी करावी त्यास माझी तयारी आहे. पंढपुरातील एका सभेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले माझे वाझेशी कधीही बोलणे झाले नाही. त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचा काहीही संबंध नाही. तरीही माझे नाव का घेतले जात आहे मला माहिती नाही.

माझे या प्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप खोटा आहे. अनिल देशमुखांसोबत माझीही सीबीआयने चौकशी करावी. चौकशीत दूध का दूध पानी का पानी होईल. विरोधकांकडून मुद्दाम हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्यांनी विरोधकांवर यावेळी केला आहे.

महत्वाच्या बातम्या
पैशांची कमी नाही तरी या गावातील लोक कपडेच घालत नाहीत, पर्यटकांनाही कपडे काढूनच जावे लागते
मधल्याकाळात माझा ट्रॅक चुकला होता, पण आता पुर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करणार- कल्याणराव काळे
महाराष्ट्राने लस केंद्राकडे नाहीतर काय अमेरिकेकडे मागायची का? डॉ. सुभाष साळुंखे संतापले


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: