लसी वाटपात दुजाभाव, आता केंद्राने दिलेले व्हेंटिलेटरही खराब, पुण्यातील प्रकार उघड
पुणे । राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यामध्ये मुळातच व्हेंटिलेटरची कमतरता असताना आता केंद्राकडून पीएम केअरमधून मिळालेले ५८ व्हेंटिलेटर खराब असल्याचे उघड झाले आहे. यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना आला आहे.
केंद्र सरकारने पुणे शहरासाठी १६५ नवे व्हेंटिलेटर देण्याची घोषणा केली होती. मात्र यामध्ये खराब व्हेंटिलेटर असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील हे व्हेंटिलेटर आहेत. यामुळे आता अडचणी वाढल्या आहेत.
पुण्यामध्ये वाढत्या कोरोना प्रसारामुळे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. यामध्ये ससूनच्या डीनने ही बाब समोर आणली आहे.
आता रुग्णालयात असलेल्या व्हेंटिलेटरवर कसेबसे भागवायची वेळ आली आहे. यामुळे आता पुण्यातील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. रुग्णांना बेड देखील उपलब्द नाहीत. सध्या ससूनमध्ये ८७ व्हेंटिलेटर आहेत. ते सगळे वापरात आहेत.
पीएम केअरचे व्हेंटिलेटर आले होते, त्यामधील ७० टक्के व्हेंटिलेटर खराब आहेत. लसीकरण वाटपात देखील राजकारण केले जात असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्राला लसीचे डोस इतर राज्यांच्या तुलनेत कमी दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
0 Comments: