महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री गोत्यात; पत्रकाराच्या खुनाचा आरोप
राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येला नवीन वळण लागले आहे. पोलीस तपासात असे आढळले आहे की यामध्ये हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो ऊर्जा भूखंड जयंत पाटलांचे भाचे आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबधीत आहे.
दातीर यांची हत्या झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून तनपुरे अजूनही त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेले नाहीत अशी माहिती समोर आली आहे. कारण त्यांना भीती आहे की जर भेटायला गेलो तर दातीर यांची पत्नी त्यांच्यावरच आरोप करेल.
या भूखंड प्रकरणात तक्रारी करून अडथळा आणत असल्यामुळे दातीर यांची हत्या झाली आहे असा दावा माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी केला आहे. त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
कर्डीले यांच्या दाव्यामुळे असे दिसत आहे की महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत आल्याचे दिसत आहे. ६ एप्रिलला दातीर यांची अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी तपास केला असता यामध्ये प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. यामध्ये राहुरीचे माजी आमदार कर्डीले पोलीस अधीक्षकांशी बोलण्यास आले होते तेव्हा त्यांनी पत्रकारांना बोलताना अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.
ते म्हणाले की, पत्रकार दातीर यांच्या हत्येची आम्ही बारकाईने माहिती घेतली. ते म्हणाले की, दातीर यांची हत्या १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबधी सतत तक्रार अर्ज दाखल करून अडचणी वाढवत असल्याने त्यांचा खून झाला आहे. हे भूखंड पठारे या शेतकऱ्याच्या नावावर आहे.
मात्र नगरपालिकेने येथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. या जागेत आता सोहम ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. ही कंपनी आता प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर असून सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे.
या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागीदार आहेत. दातीर यांना पठारे कुटुंबियांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर कुटुंब कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या.
दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रारही दिली होती, असा खुलासा कर्डीले यांनी केला आहे आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
0 Comments: