लॉकडाऊनला दुसरा पर्याय काय?; राऊतांचा फडणवीसांना सवाल

April 11, 2021 0 Comments

मुंबईः राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आता संपूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. तर, राज्याचे विरोधी पक्ष नेते यांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. यावरुन शिवसेना नेते यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 'देशात लॉकडाऊनची गरज आहे की, नाही याचा निर्णय पंतप्रधान घेतील. पण काल मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी लॉकडाऊनची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसं संकेत त्यांनी दिले आहेत,' असं संजय राऊत म्हणाले आहेत. 'सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लॉकडाऊन लागू करावा लागेल का याचा विचार व्हायला पाहिजे. पश्चिम बंगालाच्या निवडणुकीमुळं सध्या केंद्र सरकार स्वार्थ पाहत आहे. आज पश्चिम बंगालमध्ये शक्तीप्रदर्शन सुरु आहे. पण मला वाटतं पश्चिम बंगालच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर याविषयी केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतो,' असं मत राऊतांनी व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको अशी भूमिका मांडली आहे. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 'लोकांना लॉकडाऊन नको असं फडणवीसांनी सांगितलं. हे अगदी योग्य आहे. मात्र, ही गोष्ट सरकारलाही माहिती आहे. मग लोकांचे जीव वाचवण्याचा दुसरा पर्याय आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, जर मोदींनी देशात पुन्हा लॉकडाऊन केला तर देवेंद्र फडणवीस म्हणतील का महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा. अशा परिस्थीतीत राजकारण करणं कोणालाही शोभत नाही,' असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: