खासदाराची माणसं निवडून येऊ देऊ नका; भाजप आमदाराची क्लिप व्हायरल

April 07, 2021 0 Comments

प्रवीण खंदारे । नांदेड नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारत बॅंकेवर वर्चस्व सिद्ध केलं आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वात ही निवडणूक महाविकास आघाडीनं जिकंली आहे. पण आता चव्हाण यांना भाजपच्या आमदारांनी मदत केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (BJP MLC Ram Ratolikar Helps In Nanded District Bank Election) वाचा: निवडणूक निकालानंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळं नांदेड भाजपमधील गटबाजी उघड झाली आहे. जिल्हा भाजपमध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा एक गट आहे. तर, इतर स्थानिक नेत्यांचा दुसरा गट कार्यरत असून हा गट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. वाचा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने एकूण २१ जागांपैकी १७ जागांवर विजय संपादन करून वर्चस्व स्थापित केले, तर भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. परंतु काँग्रेस आघाडीच्या यशामागचे बिंग आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे फुटले आहे. यात आमदार रातोळीकर म्हणतात, जिल्हास्तरावर आपणास हेलिकॉप्टर निशाणीला मतदान करायचे आहे. आपल्या सर्व विश्वासू मंडळींना तसा निरोप द्या, मला बिनविरोध काढायचे निश्चित झाले होते. कुंटूरकर यांनीही तशी तयारी दाखवली होती. ते उमेदवारी मागे घेणार होते. परंतु खासदारांनी विरोध केला. त्यामुळे आपणास कोणत्याही परिस्थितीत खासदारांची माणसे निवडून येऊ द्यायची नाहीत. रातोळीकर यांनी मोबाइलवरून काही मतदारांशी हा संवाद साधला आहे. मात्र, तो लपून राहिला नाही. निवडणुकीचे सूप वाजल्यानंतर आता रातोळीकर व मतदारांमधील या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागली आहे. पक्षातील या अंतर्गत गटबाजीवर भाजपमधील वरिष्ठ नेते काय तोडगा काढणार, हे पाहावे लागणार आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: