अमरावतीमध्ये लॉकडाऊनची गरज नाही; यशोमती ठाकूर यांचा विरोधाचा सूर

April 07, 2021 0 Comments

जयंत सोनोने । अमरावती जिल्ह्यात मध्यंतरी मोठ्या प्रमाणात करोना रुग्णाची संख्या वाढल्याने टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांनी टाळेबंदीला प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र सध्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्यानं टाळेबंदीचे निर्बध शिथील करण्याची मागणी महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी केली आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्या मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. () वाचा: राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारच्या वतीने अंशत: टाळेबंदी जाहीर करण्यात आली. मध्यंतरी शहरासह जिल्ह्यातील अचलपूर येथे मोठ्या प्रमाणत करोनाचे रुग्ण आढळल्याने टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असून टाळेबंदी करण्याची आवश्यकता नाही. राज्य शासनाने लावलेले निर्बंध शिथील करण्यात यावे, अशी सर्वांचीच मागणी आहे. वाचा: राज्य सरकारने एका महिन्याचे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केल्यानंतर जिल्ह्यातील व्यापारी व कामगार वर्गामध्ये नाराजी आहे. अनेक ठिकाणी निवेदने सुद्धा देण्यात आली. सध्या शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात असून मृत्युदर सुद्धा कमी आहे. मध्यंतरी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे करोनाला आळा घालण्यात काही प्रमाणात यश आलं आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यशोमती ठाकूर जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती देणार आहेत. राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधांपैकी जिल्ह्यात शनिवार-रविवारचा जनता कर्फ्यू मान्य आहे. मात्र, सोमवार ते शुक्रवार लावण्यात आलेले निर्बंध शिथील करायला हवेत, असं ठाकूर यांचं म्हणणं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: