अमित शहा तुम्हीच ‘तो’ गोळीबाराचा कट रचलाय, राजीनामा द्या; ममता बॅनर्जी आक्रमक
पश्चिम बंगाल | पश्चिम बंगालमध्ये मतदानाला सुरूवात झाल्यानंतर भाजप आणि तृणमुल काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी मतदान केंद्रावर परिस्थीती नियंत्रणात आणत असताना केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर निशाणा साधला आहे. कुचबिहारच्या सीताकुचली भागात झालेला गोळीबार हा पुर्वनियोजित होता. गृहमंत्री अमित शहा यांनीच हा कट रचला असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, कुचबिहारमध्ये मतदान असल्याने तिथे आचारसंहिता लागू करण्यात आली होती. त्यामूळे मला तिथे जाता आले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देणार असल्याचं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी मतदारांवर गोळीबार का केला? असा सवालही त्यांनी केला आहे.
घटनेनंतर भाजप आणि तृणमुल काँग्रेस एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमुल काँग्रेसला पराभव दिसू लागला असल्याने त्यांचे कार्यकर्ते गोंधळाची परिस्थिीती निर्माण करत असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी गोळीबार झालेल्या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. मतदानाच्या वेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवांनाना घेराव घालण्यात आला. त्यामूळे स्वसंरक्षणासाठी जवानांनी गोळीबार केला असल्याचं प्राथमिक अहवालामध्ये नमुद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन?आज टास्क फोर्सच्या महत्वाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार
कोरोना रूग्णांचा एकटेपणा घालवण्यासाठी नर्सने जे केलं ते वाचून तुमचे डोळे भरून येतील
महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री गोत्यात; पत्रकाराच्या खुनाचा आरोप
धक्कादायक! विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसाला दगडाने ठेचले
0 Comments: