सरकारच्या डोक्यावर कर्ज झाले तरी चालेल पण व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करा – फडणवीसांची मागणी
राज्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आह, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखल्या जात आहे, तसेच राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
अशात राज्यभरात कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, तसेच कोरोनाला आवर घालायचा असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे म्हटले होते, आता मुख्यंत्र्यांच्या या वक्तव्यावर फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात लॉकडाऊन करायचा असेल, तर सरकाररने दुकानदार आणि व्यापाऱ्यांना काय पॅकेज देणार आहे, याबाब घोषणा करावी. अन्यथा आम्ही लॉकडाऊन जुमानणार नाही, असे विरेन शहा यांनी म्हटले आहे.
तसेच जर राज्यातील दुकाने बंद राहतील, तर ऑनलाईन डिलिव्हरी बंद ठेवा. ऑनलाईन डिलिव्हरी सेवा सुरु राहिली तर आम्ही त्याला विरोध करु, असेही विरेन शाह यांनी म्हटले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, त्यावेळी राज्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असे म्हटले होते, पण याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे.
पुर्ण लॉकडाऊन करायचा असेल, तर राज्य सरकारने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी लागेल, त्यासाठी सरकारच्या डोक्यावर कर्ज झाले तरी चालेल, अशी भुमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
लसी वाटपात दुजाभाव, आता केंद्राने दिलेले व्हेंटिलेटरही खराब, पुण्यातील प्रकार उघड
महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री गोत्यात; पत्रकाराच्या खुनाचा आरोप
आता घरबसल्याच जोडा रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव; वाचा सोपी पद्धत…
0 Comments: