मोठा खुलासा, प्रदीप शर्माने सचिन वाझेला पोलीस सेवेत घेण्यासाठी घेतली होती भाजप मंत्र्याची भेट
सध्या NIA आणि CBI वसुली रॅकेटच्या आरोपाची चौकशी करत आहे. या तपासात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि एनकाऊन्टर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचे खूप जवळचे संबंध होते.
एका नेत्याने सांगितले आहे की प्रदीप शर्मा यांनी २०१६ मध्ये सचिन वाझे यांना वाचवण्यासाठी भाजपा सरकारशी संपर्क केला होता. एका भाजप आमदाराने नाव उघड न करण्याच्या अटीवरून सांगितले की ही बैठक मुंबई विमानतळाच्या जवळ असलेल्या हॉटेल लीला येथे झाली होती.
मुंबई गुन्हे शाखेचे तत्कालीन अधिकारी आणि एनकाऊन्टर स्पेशलिस्ट सिक्रेट मिटींगला त्या हॉटेलमधे बसले होते. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्याला सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली होती. परंतु भाजपने त्याला विरोध केला होता.
प्रदीप शर्मा यांचा हा प्रयत्न फेल गेल्याने त्यांनी थेट शिवसेनेच्या नेतृत्वात वाझे यांना पोलीस दलात घेण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र सचिन वाझे यांच्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे असं सांगत भाजपने ही शिफारस मान्य केली नव्हती.
सध्या NIA प्रदीप शर्मा यांच्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे मिळण्याच्या तयारीत आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवण्यात आली होती त्यामध्ये सचिन वाझे याना प्रदीप शर्मा यांचे समर्थन होते असा संशय आहे.
तपास केल्यानंतर सचिन वाझे यांनी तसे संकेत दिले होते की प्रदीप शर्मा यांनी जिलेटीनच्या कांड्या खरेदी केल्या होत्या आणि नंतर स्फोटक म्हणून त्याचा वापर केला होता. असे वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे. मात्र हे सिद्ध करण्यासाठी कोर्टाला पुरावा हवा आहे.
त्यावर भाजप आमदार राम कदम म्हणाले होते की, प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्यातील संबधाबाबत मी काहीही बोलू शकत नाही. परंतु प्रदीप शर्मा हे सचिन वाझेचे मार्गदर्शक होते हे खरे आहे. सर्व पोलिसांना ते माहीत आहे.
महत्वाच्या बातम्या
अमित शहा तुम्हीच ‘तो’ गोळीबाराचा कट रचलाय, राजीनामा द्या; ममता बॅनर्जी आक्रमक
सरकारच्या डोक्यावर कर्ज झाले तरी चालेल पण व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करा – फडणवीसांची मागणी
आता घरबसल्याच जोडा रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव; वाचा सोपी पद्धत…
आमिर खानसारख्या पतीसोबत राहणे कठिण झाले आहे; पत्नी किरण रावचा खुलासा
0 Comments: