बॉलीवूड अभिनेत्री लिसा रेचे कॅनेडाच्या डोंगर रांगामध्ये आहे आलिशान घर; पहा फोटो

April 23, 2021 , 0 Comments

बॉलीवूड अभिनेत्री लिसा रे सध्या बॉलीवूडपासून दुर राहत आहे. लिसाने आफरीन आफरीन या म्यूजिक व्हिडीओतून इंडस्ट्रीमध्ये मिळवली होती. तिला या गाण्यात पाहून अनेकांना वेड लागले होते. लिसाचे सौंदर्य आणि अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला.

त्यानंतर लिसाने मागे वळून पाहीले नाही. कसूर चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात तिचे सौंदर्य पाहून लोकं परत एकदा पागल झाली होती. लिसाने २५ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला खास यश मिळाले नाही.

चित्रपटांपेक्षा जास्त लिसा तिच्या वैयक्तिक आयुष्यामूळे जास्त चर्चेत होती. तिने कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचा सामना केला आहे. एकदा सोडून दोन वेळा लिसा कॅन्सरचा शिकार झाले होती. लिसा सध्या चित्रपटांपासून दुर आहे. पण वेबसिरीजच्या माध्यमातून अभिनयात मात्र सक्रिय आहे.

लिसाने कॅनेडियन बिजनेस मॅनसोबत लग्न केले होते. लग्नानंतर ती नवऱ्यासोबत कॅनडामध्ये राहत आहे. लिसाला दोन मुली आहेत आणि ती दोन मुली व पतीसोबत कॅनडाच्या सुंदर भागात राहते. तिच्या घर डोंगरामध्ये आहे. त्यामुळे घराचा नजारा खुपच वेगळा आहे.

लिसा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. तिचे म्हणणे आहे की, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा सर्वात पर्याय म्हणजे सोशल मीडिया. तिच्या कुटुंबासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यात तिच्या सुंदर घराचे फोटो देखील दिसतात.

लिसाचे घर कॅनडामध्ये आहे. तिच्या घराच्या दोन्ही बाजूंना डोंगर आहे. त्यासोबतच घराच्या शेजारून नदी वाहते. म्हणून तिचे घर खूपच सुंदर दिसते. ती अनेकदा तिच्या घराच्या शेजारील गोष्टींचा व्हिडिओ पोस्ट करत असते.

लिसाच्या घरातील सगळे सामान खूप महाग आहे. तिच्या या घराची किंमत १५० करोड पेक्षा जास्त आहे. सोबतच तिने घराच्या सजावटीसाठी दिवस रात्र एक केला होता. म्हणून घर खुपच सुंदर दिसते. सध्या ती कुटुंबासोबत तिथेच राहत आहे.

महत्वाच्या बातम्या –
बॉलीवूडमधील लोकप्रिय नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन
पारदर्शक कपडे घालून फोटोशुट करणे अभिनेत्रीला पडले महागात; लोकं म्हणाले थोडी तरी लाज ठेव; पहा फोटो..
मीरा राजपूतने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे; व्हिडिओ पाहून हैराण झालेला पती शाहिद कपूर म्हणाला…
लाडकी दयाबेन दिशा वकानी पुन्हा एकदा दिसणार तारक मेहतामध्ये; पहा गरब्याचा स्पेशल व्हिडीओ


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: