कोरोनावर औषध शोधणाऱ्या बाबा रामदेव यांच्याच संस्थेत कोरोनाचा शिरकाव, ८३ जणांना कोरोनाची लागण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असतानाच आता कोरोना विषाणूचा शिरकाव पतंजलीच्या योगपीठातही झाला आहे.
हरिद्वारमधल्या पतंजलीच्या योगपीठात कोरोनाचा प्रसार झाला आहे. या योगपीठात ८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
पतंजलीच्या योगपीठात अनेक संस्थांमध्ये दरदिवशी कोरोना रुग्ण मिळत आहे. असे एकूण ८३ कोरोना रुग्ण आहे, अशी माहिती मिळाली आहे. या सर्वांना आयसोलेट करण्यात आले आहे. तर आता संस्थेच्या लोकांसह बाबा रामदेव यांचीही कोरोना टेस्ट करण्यात येण्याची शक्यता आहे.
१० एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये ८३ कोरोना रुग्ण सापडले आहे. या रुग्णांना पतंजली संस्थेच्या परिसरात आयसोलेट करण्यात आले आहे, अशी माहिती हरिद्वारमधील सीएमओ डॉक्टर शंभु झा यांनी दिली आहे.
दरम्यान, बाबा रामदेव यांनी कोरोनावर औषध आणले होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे औषध फायद्याचे ठरेल, असा दावाही बाबा रामदेव यांनी केला होता.आता मात्र त्यांच्याच योगपीठात कोरोनाचा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अशात उत्तराखंड राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सध्या राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १,३४,०१२ च्यावर गेली आहे, तर कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्या रुग्णांची संख्या १९५३ इतकी आहे.
महत्वाच्या बातम्या-
बॉलीवूड अभिनेत्री लिसा रेचे कॅनेडाच्या डोंगर रांगामध्ये आहे आलिशान घर; पहा फोटो
सलाम! कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत मोफत रिक्षा प्रवास; पुण्यातील तरुणांचा उपक्रम
६० हजार रेमडेसिविरची गरज असताना पुरवठा मात्र २६ हजार, केंद्राकडून महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय
0 Comments: