सलाम! कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत मोफत रिक्षा प्रवास; पुण्यातील तरुणांचा उपक्रम
पुणे । सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहे. आता रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, म्हणून काही तरुण एकत्र आले आहेत.
हे तरुण शहरातील कानाकोपऱ्यातील कोरोनाबाधित रुग्णांना पैसे न घेता मोफत रुग्णालयात घेऊन जात आहेत. राहुल शिंदे असे रिक्षाचालक आणि मालकाचे नाव आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रुग्णवाहिका किंवा मोटर, रिक्षा न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या देखील अनेक घटना समोर येत आहेत. बाधित रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यास वाहनचालक नकार देत असल्याच पाहायला मिळत आहे.
अनेक रुग्णांना रुग्णवाहिका मिळेलच असे नाही. त्यामुळे शिंदे यांच्या स्वतः च्या मालकीच्या पाच रिक्षा असून लॉकडाउन असल्याने एकाच जागी थांबून आहेत. मात्र, त्याचा समाजासाठी उपयोग करत बाधित रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्याचे काम ते करत आहेत.
यामध्ये त्यांचे मित्र शुभम दुबळे, रवींद्र जाधव, मनोज सुतार, सुधीर कांबळे हे धावून आले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांचा फोन आल्यानंतर यापैकी जो उपलब्ध असेल तो व्यक्ती त्या रुग्णापर्यंत पोहचतो आणि रिक्षाने रुग्णालयात घेऊन जातो.
त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोना काळात प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे. पुण्यात सध्या रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाहीत. यामुळे रुग्णसंख्या वाढत असताना या तरूणांनी केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे.
ताज्या बातम्या
मोठी बातमी! विरारच्या कोरोना रुग्णालयात भीषण आग; १३ रुग्णांचा होरपळून मृत्यु
६० हजार रेमडेसिविरची गरज असताना पुरवठा मात्र २६ हजार, केंद्राकडून महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय
सोनाली बेंद्रे आहे करोडोंच्या संपत्तीची मालकीण; पहा तिच्या घराचे फोटो
0 Comments: