पुण्यात करोनाचा उद्रेक; रुग्णांसाठी भाड्यानं घेतली हॉटेल्स

April 07, 2021 0 Comments

पुणेः राज्यात करोना रुग्णांचा दैनंदिन आकडा ५५ हजारांवर पोहोचला आहे. तर, मुंबई, पुणे या महानगरातही करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णवाढीबरोबरच अॅक्टिव्ह रुग्णही वाढत आहेत. तर, काही ठिकाणी करोनाबाधितांसाठी बेडची कमतरता जाणवत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं रुग्णांसाठी रुग्णालयानं हॉटेल्स भाड्यानं घेतल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील करोना रुग्णसंख्या धडकी भरवणारी आहे. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण सापडत असताना रुग्णालयातील बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. पुण्यातील रुबी रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार, करोना रुग्णांची वाढत्या संख्येमुळं बेडची कमतरता भासत आहे. रुग्णालयानं तीन हॉटेल भाड्यानं घेतली असून तिथं १८० बेडची व्यवस्था केली आहे. या रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुण्यातील सरकारी रुग्णालयात व अन्य रुग्णालयातही बेडही लवकरच भरतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत बेड उपलब्ध मुंबईतही झपाट्याने करोना संसर्ग वाढतोय. मुंबईत दररोज दहा हजारांवर रुग्णसंख्या वाढत आहे. अशातच नागरिकांना बेडच्या उपलब्धतेमुळं चिंता लागून राहिली आहे. बीएमसीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार सध्या मुंबईत बेडची कमतरता नसली तरी वाढणारी रुग्णसंख्या पाहता चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यात रुग्णसंख्या किती? पुणे जिल्ह्यात मंगळवारी १० हजार २२६ जणांना करोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या एकूण संख्येनं ८१ हजारांचा टप्पा पार केला असून, मंगळवारी जिल्ह्यात २८ हजारांपेक्षा अधिक चाचण्या झाल्या आहेत. पुण्यात काल ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: