मोठी बातमी! विरारच्या कोरोना रुग्णालयात भीषण आग; १३ रुग्णांचा होरपळून मृत्यु
देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. असे असताना मुंबईच्या विरारच्या एका रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे.
विरारमध्ये असलेल्या विजय वल्लभ या कोविड रुग्णालयात भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १३ रुग्णांचा जळून मृत्यु झाला आहे. या घटनेने पुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळवर पोहचल्या आहे. त्यानंतर त्यांनी ही आग विझवण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत १३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
विरारच्या या कोविड रुग्णालयात १५ रुग्ण आयसीयुमध्ये होते. त्यामधल्या १३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. ही आग आज सकाळी ३ वाजेच्या सुमारास लागली होती.
तसेच या रुग्णालयात ९० रुग्ण होते, ज्या रुग्णांना ऑक्सिजनी गरज होती, त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कशामुळे आग लागली याची अद्याप माहिती मिळाली नाही.
वसई-विरार महानगरपालिकेच्या १० आग्निशामक दलाच्या गाड्या ही आग विझण्यासाठी घटनास्थळी पोहचल्या आहे. अशात रुग्णासोबत असलेल्या एका नातेवाईकाने दावा केला आहे की ही आग शॉर्टसर्कीटमुळे झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
६० हजार रेमडेसिविरची गरज असताना पुरवठा मात्र २६ हजार, केंद्राकडून महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय
ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाचे सीईओ ढसाढसा रडले
मुंबईचा ऑक्सिजन मॅन! २२ लाखांची गाडी विकून आलेल्या पैशातून गरीबांना मोफत ऑक्सिजन वाटप
0 Comments: