आरोग्य दिनाचा योग साधत पवारांनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस; म्हणाले...
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी करोनावरील लसीचा दुसरा डोस घेतला आहे. शरद पवारांनी निवासस्थानीच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. तात्याराव लहाने हे उपस्थित होते. १ मार्च रोजी शरद पवार यांनी करोवावरील लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एक महिन्याने त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. योगायोग म्हणजे आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यामुळं केंद्र सरकारच्या नियमानुसार प्रत्येकानं आपापले लसीकरण पूर्ण करावे, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे. जे. जे रुग्णालयाच्या परिचारिका श्रद्धा मोरे यांनी लस दिल्याबद्दल पवारसाहेबांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व वैद्यकीय पथक उपस्थित होते. शरद पवारांवर शस्त्रक्रिया पित्ताशयात खडे झाल्यानं शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते सध्या घरीच विश्रांती घेत आहेत. काही दिवसांनी पुन्हा एकदा त्यांची तपासणी केली जाईल. त्यांची प्रकृती उत्तम असल्यास त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती. शरद पवारांचे दौरे रद्द शरद पवारांवरील शस्त्रक्रियेमुळं त्यांचे अनेर राजकीय दौरे रद्द करण्यात आले आहेत. पश्चिम बंगला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार होते. मात्र आता त्यांचे सर्व राजकीय दौरे रद्द करण्यात आले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: