अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता!

April 07, 2021 0 Comments

म.टा. विशेष प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते यांच्या गृहमंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळे नेते व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नागपूरसह अन्य शहरात विस्तारासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना अचानक ब्रेक लागले असल्याचे बोलले जात आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप करताच राज्यात राजकीय वादळ उठले होते. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. या घडामोडीत अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या २२ वर्षांपैकी ६ वर्षांचा अपवाद वगळता तब्बल १६ वर्षे त्यांच्याकडे मंत्रिपद राहिले. त्यांच्या राजीनाम्यावर स्थानिक नेते बोलण्यास तयार नाही. मात्र, काय व कसे होईल, असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला आहे. आगामी वाटचालीवरून समर्थक, निष्ठावान व पक्षाचे अन्य कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण समोर करून काय परिणाम होतील, यावर अनेकांनी भाष्य करण्याचे टाळले. वाचा: अनिल देशमुख जिल्ह्याचे पालकमंत्री व नागपूरचे संपर्कमंत्री होते. दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते कामाला लागले असताना तयारीला ब्रेक लागला असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जिल्हाध्यक्ष बाबा गुजर तसेच, देशमुख यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य सलिल यांनी नागपूर जिल्ह्यात निवडणुकीसोबतच संघटनेवर लक्ष केंद्रित केले होते. त्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीने शहरात महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली. शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी विविध उपक्रम सुरू केले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत अनिल देशमुख यांनी नागपुरात जनसंपर्क अभियान सुरू केले होते. करोनाची दुसरी लाट तीव्र होण्यापूर्वी उभय नेत्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला होता. या नव्या घडामोडींनी पक्ष विस्ताराला फटका बसेल, असे मानले जात आहे. वाचा: उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश देताच अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या आधारे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तपासात सत्य बाहेर येईल व 'दुध का दुध, पाणी का पाणी' होईल. यापूर्वीचे मुख्यमंत्री न्यायाधीशाच्या भूमिकेत होते. आरोप झालेल्या मंत्र्यांना तेच क्लीन चीट द्यायचे. मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला असला तरी, संघटनेचे काम चालेल आणि विस्तारही होईल, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रवीण कुंटे यांनी केला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: