परमबीर सिंग एनआयए कार्यालयात; अँटेलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

April 07, 2021 0 Comments

मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कार्यालयात पोहोचले आहेत. अँटेलिया बाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन आणि मनसुख हिरनं हत्या प्रकरणी सध्या एनआयए तपास करत असून या प्रकरणात यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. परमबीर सिंग हे आज सकाळीच एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. अँटेलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरनं हत्या प्रकरणाबाबत एनआयएकडून आज परमबीर यांचा जबाब नोंदवणार आहेत. परमबीर सिंग यांच्या जबाबातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निलंबित पोलीस अधिकारी या प्रकरणीही परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहखात्याला पाठवलेल्या अहवालात परमबीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. तसंच, सचिन वाझे वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिपोर्ट न करता थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे, असं या अहवालात नमूद केलं आहे. सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात एनआयएच्या विशेष कोर्टाने मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब परमबीर सिंग यांच्या बदलीचे आदेश निघाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपालांना लिहलेल्या पत्रात यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसुलींचे टार्गेट दिलं असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. तसंच, या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. परमबीर सिंग यांच्या याचिकेनंतर हायकोर्टानं अनिल देशमुखांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करुन १५ दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होतं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: